मतदान न करणाऱ्यांना ‘अशी’ सभ्य वागणूक द्या; प्राजक्ता माळीच्या पोस्टने लक्ष वेधलं
Actress Prajkta Mali on Voting Loksabha Election 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही वेगवेगळ्या गोष्टींवर आपली मतं मांडत असते. आज मुंबईसह अन्य ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. यावरही प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताने या पोस्टमध्ये काय म्हटलंय? वाचा सविस्तर...
देशभरात आज पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. मुंबईसह अन्य मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडते आहे. सेलिब्रिटीदेखील मतदान करताना दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील आज मतदान केलं आहे. याआधी ती पुण्यात मतदान करत होती. मात्र यंदा पहिल्यांदाच प्राजक्ताने मुंबईत मतदान केलं आहे. मतदान केल्यानंतर प्राजक्ताने फोटो शेअर केला आहे. यात तिने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच मतदान न करणाऱ्यांना तिने सभ्य भाषेत सुनावलं देखील आहे.
प्राजक्ता माळी हिने आधी मतदानाचं कर्तव्य बजावा, मग आपली कामं करा, असं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच आपल्या आसपासचं कुणी जर मतदान करत नसेल तर त्याला मतदान करायला भाग पाडा, असं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.मतदान केलंत का? आज हा प्रश्न लोकांना विचारा… जे लोक म्हणतील की आम्ही मतदान केलं नाही. त्यांना अपराधी वाटेल अशी ‘सभ्य’ वागणूक द्या, असं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्राजक्ता माळीची पोस्ट जशीच्या तशी
आधी मतदान मग बाकीचे काम
मी माझं कर्तव्य बजावलं, तुम्ही?
(मुंबईकर, आज हा प्रश्न प्रत्येकाला विचारा; ज्याचं उत्तर नाही येईल त्याला guilt येऊन तो त्वरित मतदानास जाईल अशी ‘सभ्य’ वागणूक द्या.)
आपलं पुढील ५ वर्षांसाठीचं भविष्य निश्चित करा. मतदान करा. यंत्रणा आपल्या प्रतिक्षेत आहे.
(आत्तापर्यंत पुण्यात मतदान करत आले; मुंबानगरीतील हे पहिलं मतदान.)
View this post on Instagram
प्राजक्ता माळी ही संवेदनशील अभिनेत्री आहे. ती विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडत असते. आताही तिने मतदान करण्यावर तिने भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट केली आहे. अनेकांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. प्राजक्ताला फरसाण खायला खूप आवडतो. यावरूनच एका नेटकऱ्याने कमेंट केलीय. आमचं ठरलंय…आधी मतदान आणि मगच फरसाण!, असं तो नेटकरी म्हणाला आहे.
मुंबईतील सहा मतदारसंघ, कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. कलाकारही तसं आवाहन करताना दिसत आहेत.