मी माझ्या आई-वडिलांना रोज फोन करतो, कारण…; भूषण प्रधानचं विधान चर्चेत

Actor Bhushan Pradhan on his Parents and Jun Furniture Movie : अभिनेता भूषण प्रधान याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्याने सिनेमासोबतच त्याच्या पालकांविषयी महत्वाचं विधान केलं आहे. तो नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर...

मी माझ्या आई-वडिलांना रोज फोन करतो, कारण...; भूषण प्रधानचं विधान चर्चेत
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 5:48 PM

भूषण प्रधान… मराठीतील आघाडीचा अभिनेता… भूषणचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जुनं फर्निचर’ या भूषणच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटात भूषण प्रधानने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या ट्रेलर लाँच सोहळ्यात भूषणने एक खास गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली. त्याच्या आईबाबांसोबत असणारं त्याचं नातं यावेळी भूषणने प्रेक्षकांसमोर मांडलं. हा चित्रपट केल्यानंतर त्याच्या जीवनात मोठा बदल झाला. भूषण त्यांच्या आईबाबांना आता रोज आवर्जून फोन करतो. रोज फोन करण्यामागचं कारणही त्याने यावेळी सांगितलं. तसंच यावेळी भूषणने त्याच्या बाबांच्या मनातील एक इच्छाही पूर्ण झाल्याचे यावेळी म्हणाला.

“…म्हणून, आई-वडिलांना रोज फोन करतो”

प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण आपल्या आईबाबांसाठी खूप करतो. परंतु आईवडिलांना नक्की काय हवं आहे, हे आपल्याला- मुलांना कळतच नाही. दिवसभरातील थोडा वेळ, प्रेमाचे, आपुलकीचे दोन शब्द त्यांना हवे असतात. आपण तेच नेमके करत नाही. कामं तर होतच राहतील. पण आई-वडिलांकडे दुर्लक्ष होता कामा नये. याची जाणीव मला हा चित्रपट करताना झाली. म्हणूनच मी घराच्या बाहेर असताना आई-बाबांना नित्यनियमाने फोन करतो, असं भूषण म्हणाला.

बाबांची इच्छा पूर्ण- भूषण

‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परीपूर्ण घर नक्कीच बनू शकतं. त्यामुळे आपण आपल्या आई-बाबांना वेळ द्यायलाच हवा. मी अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करतोय. परंतु महेश मांजरेकर सरांसोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि माझ्यापेक्षाही माझ्या वडिलांची इच्छा जास्त होती.त्यामुळे ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. आज माझ्या बाबांच्या इच्छा पूर्ण झाली आहे, असं भूषण म्हणाला.

‘जुनं फर्निचर’ कधी रिलीज होणार?

सत्य -सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. येत्या 26 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर यतिन जाधव हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.