साऊथच्या सिनेमाचा फिल मराठी चित्रपटात; मातीशी नाळ असणारा ‘रांगडा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Rangada Movie Teaser Launch : तुफान अॅक्शन, दमदार कथानक असलेला 'रांगडा' सिनेमा.... साऊथच्या चित्रपटांची आठवण करून देणारा 'रांगडा' या सिनेमाची सध्या चर्चा होतेय. रांगडा चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच झाला आहे. येत्या 5 जुलैला प्रदर्शित होणार आहे. वाचा सविस्तर...
साऊथच्या चित्रपटांमध्ये तुफान अॅक्शन सिक्वेन्स, दमदार कथानक असलेले चित्रपट असतात. हाच अनुभव प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट सांगणाऱ्या ‘रांगडा’ या चित्रपटातून मिळणार आहे. ‘रांगडा’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. पाच जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. साऊथच्या चित्रपटांची आठवण करून देणारा ‘रांगडा’ या सिनेमाची सोशल मीडियावर सध्या चर्चा होतेय. तुफान अॅक्शन, दमदार कथानक असलेला ‘रांगडा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्राच्या मातीतली ही गोष्ट आहे. हा सिनेमा नावाप्रमाणेच ‘रांगडा’ आहे.
‘रांगडा’ सिनेमाचं कथानक काय?
महाराष्ट्राची ओळख असलेल्या कुस्ती आणि बैलगाडा शर्यत या दोन गोष्टींवर आधारित एक धमाकेदार कथानक ‘रांगडा’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे चित्रपटाचं कथासूत्र आहे. त्याशिवाय त्याला प्रेमकथेचाही पदर आहे.
बैलगाडी हाकत येणाऱ्या सुंदर तरुणीपासून सुरू होणाऱ्या टीजरमधून कुस्ती, बैलगाडा शर्यत, आखाडा, राजकारण, तुफान अॅक्शनचं दर्शन घडतं. त्यामुळे आता रांगडा हा चित्रपट नावाप्रमाणेच रांगडा असणार याची खात्री टीजरने पटवून दिली आहे. पुरेपूर मनोरंजनाची हमी देणारा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता थोडेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कलाकार कोण?
भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे,अतिक मुजावर, संदीप रासकर,राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी ‘रांगडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली आहे. बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे.