‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’ फेम प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’ विजय पाटील यांचं निधन

नागपुरचे सुपुत्र आणि जेष्ठ संगीतकार ‘रामलक्ष्मण’ (Ram Laxman) जोडीतील संगीतकार लक्ष्मण अर्थात विजय पाटील (Vijay Patil) यांचे आज (22 मे) नागपूर येथे निधन झाले.

‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान' फेम प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’ विजय पाटील यांचं निधन
राम लक्ष्मण - विजय पाटील
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 11:59 AM

मुंबई : नागपुरचे सुपुत्र आणि जेष्ठ संगीतकार ‘रामलक्ष्मण’ (Ram Laxman) जोडीतील संगीतकार लक्ष्मण अर्थात विजय पाटील (Vijay Patil) यांचे आज (22 मे) नागपूर येथे निधन झाले. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेंद्र हेंद्रे अर्थात राम आणि विजय पाटील अर्थात लक्ष्मण अशी ही ‘राम-लक्ष्मण’ जोडी होती. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. 1977 साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने चित्रपटांना संगीत दिले (Music Composer Ram Laxman fame Vijay Patil passed away).

मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यंत त्यांनी सुमारे 75 हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले होते.

लता मंगेशकर यांनी वाहिली श्रद्धांजली

दादा कोंडकेंनी दिली संधी

16 सप्टेंबर 1942 रोजी नागपूर येथे जन्मलेल्या विजय पाटील यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्याचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात प्रवीण होते. त्यांच्याकडून हा वारसा विजय पाटील यांच्य्कडे आला होता. विजय पाटील यांनी वडिलांकडून संगीताचे शिकाहन घेतलेच, पण त्याचबरोबर त्यांनी संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण देखील घेतले. सुरुवातीला ते एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचे आणि तिथेच त्याची भेट प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्याशी झाली होती. त्यांचे सादरीकरण पाहून दादा इतके खुश झाले की, आपला आगामी चित्रपट ‘पांडू हवालदार’साठी त्यांनी विजय पाटील यांची निवड केली (Music Composer Ram Laxman fame Vijay Patil passed away).

हिंदीतही कमावले नाव

‘पांडू हवालदार’च्या यशानंतर ‘राम राम गंगाराम’,  ‘तुमचं आमचं जमलं’, ‘आली अंगावर’, ‘आपली माणसं’, ‘हीच खरी दौलत’, ‘देवता’, ‘लेक चालली सासरला’ अशा अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यानंतर त्यांनी हिंदीतही त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला. ‘राजश्री’च्या ‘मैने प्यार किया’ला त्यांनी संगीत दिले होते. यातील ‘धून’ खूप गाजल्या. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘अनमोल’, ‘सातवा सावन’, ‘हंड्रेड डेज’, ‘पत्थर के फूल’ अशा हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

त्यांची गाणी आजही लोकप्रिय!

‘ढगाला लागली कळ’, ‘मुझसे जुदा होकर तुम्हें दूर जाना है’, ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’, ‘देवा हो देवा गणपती देवा’, ‘गब्बर सिंग कह के गया’, ‘सुन बेलिया’, ‘तुम क्या मिले जाने जाना’, ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘ये तो सच है की भगवान है’ ही त्यांची गाणी आजही रसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या गाण्यांच्या संगीताची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. 2018मध्ये त्यांना राज्य शासनाच्या ‘लता मंगेशकर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

(Music Composer Ram Laxman fame Vijay Patil passed away)

हेही वाचा :

‘TVF Aspirants’ सीरीज वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने केला मोठा आरोप

मुलाच्या निधनाची तार आली, पण शाहिरी कार्यक्रम थांबले नाही; शाहीर इंगळेंचा हा किस्सा वाचाच!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.