‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, नागराजनं सांगितलं की, “सिनेमा काढून समाज…”

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, नागराजनं सांगितलं की, सिनेमा काढून समाज…
नागराज मंजुळे, दिग्दर्शक
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:46 PM

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे सिनेमे समाजाला अंतर्मुख करणारे असतात. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या तरी आजही तितक्याच ताज्या वाटणाऱ्या प्रश्नावर नागराज मंजुळे यांचे सिनेमे भाष्य करतात. त्यांचा ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा झोपडपट्टीतील मुलं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य यावर हा सिनेमा बेतलेला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिस गाजवत असताना नागराज यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत. तसंच “सिनेमा काढून समाज बदलत नाही,” असंही नागराज म्हणाले. पुणे कविसंमेलनात आणि कविसंमेलनानंतरच्या बैठकीत ते बोलत होते.

“जी आत्ता आहे ती संस्कृती हलकट आहे.पण तिचं वय खूप जुनं आहे आणि तुम्ही तिच्याशी जुन्याच शस्त्रांनी लढताय.कवितेने किंवा सिनेमांनी समाज बदलेल असं तुम्हाला वाटतं.पण लय भाबडे लोक आहात तुम्ही. तसं काही होणार नाही. पण आपण लढत रहायला हवं. मी कवितेतून किंवा सिनेमातून फक्त मोकळा होत असतो आणि त्याचे पैसेही मिळतात, ही गोष्ट मला खूप नंतर कळली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी… लय थंडावा मिळतो जिवाला…”, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

नागराज मंजुळे यांच्या सिनेमांइतकंच त्यांच्या कविताही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविता मनात घर करतात. उन्हाच्या कटाविरूद्ध हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे.त्याच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यातील त्याच्या मनातील ‘कोलाहल’ दाखवणारी कविता…

माझ्या हाती नसती लेखणी तर…तर असती छिन्नी सतार, बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला…

नागराज यांची ‘मित्र’ ही कविताही अनेकांच्या मनात घर करून आहे. नागराज म्हणतात…

आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलग… एकच ध्येय, एकच स्वप्न घेऊन जगणारे पुढे त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली…

संबंधित बातम्या

‘आता आपण फक्त दिवस मोजायचे’; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

मोबाईलमध्ये शूट झालेला ‘पॉंडीचेरी’ सिनेमा आता ओटीटीवर, 18 मार्चपासून ‘प्लॅनेट मराठी’वर पाहता येणार

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.