आनंद दिघेंची क्रेझ आजही कायम, ‘धर्मवीर’ची पहिल्याच दिवशीची कमाई 2.5 कोटी

तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि 10 हजारांहून अधिक शोज् सह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांनी त्याचे दमदार स्वागत केले.

आनंद दिघेंची क्रेझ आजही कायम, 'धर्मवीर'ची पहिल्याच दिवशीची कमाई 2.5 कोटी
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 8:19 PM

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या व्यक्तिमत्वात माणसं जोडण्याची एक विलक्षण ताकद -कला होती. त्यांच्या याच करिष्म्याची प्रचिती पुन्हा एकदा आलीये आणि यावेळी निमित्त ठरलंय त्यांचा चरित्रपट असलेला धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा चित्रपट (Dharmvir Movie). काल (13 मे) रोजी हा चित्रपट मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड मोठ्या दिमाखात अतिशय अभिमानाने झळकवले. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल्ल गर्दी जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.

तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि 10 हजारांहून अधिक शोज् सह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांनी त्याचे दमदार स्वागत केले. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटचा दुग्धाभिषेक केला तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहचले. आपल्या लोककारणी नेत्याला चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. प्रविण तरडे यांच्या लेखणीने सज्ज या चित्रपटातील आनंद दिघे यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या शिट्यांचा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. विविध थिएटर्समध्ये जणू उत्साहाने भरलेलं उत्सवी वातावरण बघायला मिळालं. धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल दोन कोटी पाच लाखाची घसघशीत कमाई करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

दुसरीकडे सिने समीक्षकांचाही अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक मान्यवर समीक्षकांनी 4 स्टार अशी रेटिंग देऊन चित्रपटाच्या दर्जेदारपणावर शिक्कामोर्तब केलंय. मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत लोकप्रियतेचे आणि कमाईचे नवे शिखर गाठेल असा अंदाज सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.