Timepass 3 :’याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी’, पुष्कर-कृतिकाचं ‘कूल’ रिल…
पुष्कर जोग आणि कृतिका गायकवाड यांचा भन्नाट डान्स
मुंबई : मराठीसह बॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे पुष्कर जोग. हटके भूमिकांमुळे पुष्कर जोग (Pushkar Jog) अल्पावधीतच रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. ‘जबरदस्त’, ‘धूम 2 धमाल’, सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी सिनेमांसह ‘जाना पहेचाना’, ‘इएमआय’ अशा हिंदी सिनेमांमधून पुष्करने अमराठी प्रेक्षकांच्याही मनात स्थान मिळवले आहे. पुष्कर सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतो. त्याने वैयक्तिक आयुष्यासह आगामी चित्रपटांबद्दल केलेल्या पोस्ट्सनाही चाहते कायमच उचलून धरतात. सध्या पुष्करने केलेली एक मस्त मजेदार रील चर्चेत आहे. यात तो सध्या गाजणाऱ्या एका मराठी गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. या रिलमध्ये पुष्करचा अतिशय कूल अंदाज बघायला मिळतो आहे. ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी…’ हे या आगामी सिनेमातले गाणे सध्या गाजते आहे. याच गाण्यावर ही छोटीशी रील पुष्करने केली आहे. यात पुष्करसोबत अभिनेत्री कृतिका गायकवाडसुद्धा (Krutika Gaikwad) एकदम जोशात ठुमके लावते आहे.
पुष्कर-कृतिकाचा भन्नाट डान्स
सध्या पुष्करने केलेली एक मस्त मजेदार रील चर्चेत आहे. यात तो सध्या गाजणाऱ्या एका मराठी गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. या रिलमध्ये पुष्करचा अतिशय कूल अंदाज बघायला मिळतो आहे. ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी…’ हे या आगामी सिनेमातले गाणे सध्या गाजते आहे. याच गाण्यावर ही छोटीशी रील पुष्करने केली आहे. यात पुष्करसोबत अभिनेत्री कृतिका गायकवाडसुद्धा एकदम जोशात ठुमके लावते आहे.
View this post on Instagram
आगामी टाइमपास सिनेमातील हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर चांगलेच रुळले आहे. लोकप्रिय गायिका वैशाली सामंतने ठसक्यात गायलेले हे गाणे क्षितीज पटवर्धनने लिहिले आहे. अमितराज यांच्या संगीताने हे गाणे सजले आहे. या गाण्यात आपल्या वेगवान आणि मोहक अदांनी कृतिका गायकवाड मुग्ध करते आहे. तिच्यासोबत प्रथमेश परब यानेही पुरेपुर धमाल आणली आहे.
टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांचा हा सिनेमा टाइमपास 3 येत्या 29 जुलैपासून रसिकांच्या भेटीला येतो आहे. प्रथमेश परब आणि ह्रता दुर्गुळे ही जोडी यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.