Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी वसंतराव’साठी राहुल देशपांडेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, ‘जून’ला राष्ट्रीय पुरस्कार

Rahul Deshpande : यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.

‘मी वसंतराव’साठी राहुल देशपांडेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, ‘जून'ला राष्ट्रीय पुरस्कार
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 3:08 PM

मुंबई : यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना या पुरस्काराने (National Award) गौरवण्यात आले आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी मिळाला आहे. यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ (Eka Paithanichi Gosht) या चित्रपटाला प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड ‘जून’ चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन याला मिळाला आहे.

या पुरस्काराबाबत राहुल देशपांडे म्हणतात, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’’

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या यशाबद्दल म्हणतात, ‘’हा क्षण खूप मौल्यवान आहे. ‘मी वसंतराव’ची गाणी हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि या गाण्यांना राहुल देशपांडे यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. आणि आज त्याच्या या मेहनतीचा गौरव झाला आहे, याचा आम्हांला आनंद आहे.’’ जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, आणि निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘गोष्ट एका पैठणीची’,‘जून’ला राष्ट्रीय पुरस्कार

चित्रपट क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड ‘जून’ चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन याला मिळाला आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि ‘जून’ या दोन्ही चित्रपटांची निर्मिती ‘प्लॅनेट मराठी’ची असून गोष्ट ‘एका पैठणीची’ मध्ये सायली संजीव आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहे. तर या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, चिंतामणी दगडे यांनी, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रोड्कशन या बॅनर अंतर्गत केली आहे.

वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.