राज ठाकरेंवर सिनेमा येतोय? कोण साकारणार भूमिका; तेजस्विनी पंडीतचे ‘ते’ फोटो व्हायरल
Raj Thackeray Movie : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार असल्याची चर्चा सध्या सिनेक्षेत्रात रंगत आहे. कारण काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात राज ठाकरेंसारखी दिसणारी व्यक्ती दिसत आहे. वाचा सविस्तर......
राज ठाकरे… महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणारं व्यक्तिमत्व… राज ठाकरे म्हटलं की करडी नजर, भारदस्त व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व… अशी व्यक्तीरेखा डोळ्यासमोर उभं राहातं. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेंवर सिनेमा येणार असल्याची चर्चा आहे. काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावरून राज ठाकरेंवर आधारित सिनेमा येत असल्याचं बोललं जात आहे. या फोटोत राज ठाकरेंसारखी दिसणारी व्यक्ती दिसतेय. शिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत देखील या फोटोंमध्ये दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरेंवर सिनेमा येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या एक फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. या फोटोंमुळे राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा होतेय. जर राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येत असेल तर राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार? या सिनेमात कोण- कोणत्या बाबी दाखवल्या जाणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
व्हायरल फोटोत काय?
काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत राज ठाकरे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे एक गृहस्थ दिसत आहेत. तर त्यांच्या समोर अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील दिसतेय. त्यामुळे या सिनेमात तेजस्विनी पंडीतची भूमिका काय असेल? अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती? अशी चर्चा होतेय. व्हायरल होणारे फोटो हे सिनेमाच्या सेटवरचे असल्याचं बोललं जात आहे. लवकरच या बाबतची अधिकची माहिती समोर येणार असल्याचं बोललं जात आहे.
राज ठाकरे आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांचे जवळचे संबंध आहेत. राज ठाकरेच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमांना तेजस्विनी हजर असते. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीने राज ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे, असं ती म्हणाली होती. अशातच राज ठाकरेंवर सिनेमा येणार असल्याची चर्चा होतेय. तर व्हायरल होणाऱ्या फोटोत तेजस्विनी दिसत असल्याने या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram