अनेक रहस्य, एक प्रेमकहानी…; ‘राजाराणी’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज

Rajarani Movie Release Date : 'राजाराणी' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या चार ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात हा सिनेमा पाहता येणार आहे. 'राजाराणी' या थरारक प्रेमकहाणीतून अनेक रहस्ये उलगडणार आहेत. अनोखी गावरान प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाचा सविस्तर...

अनेक रहस्य, एक प्रेमकहानी...; 'राजाराणी' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज
राजाराणी सिनेमाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 5:45 PM

एकामागोमाग एक आशयघन चित्रपट येत असताना आता पुन्हा एकदा गावरान तडका असलेली मराठमोळी अशी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आजवर इतिहासात अनेक जोड्या अजरामर झाल्या आणि या जोड्यांनी प्रेम या शब्दाची व्याख्या तयार केली. अशीच एक गावाकडील लव्हस्टोरी ‘राजराणी’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बरं ही प्रेमकहाणी नुसतीच प्रेमकहाणी नसून एक थरारक चित्र डोळ्यासमोर उभी करणारी आहे. येत्या 4 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण प्रेमीयुगुलांवर राज्य करायला सज्ज होत आहे. ही एक सत्य घटनेवर आधारित प्रेमकहाणी आहे .

रोहन- वैष्णवी पहिल्यांदाच एकत्र काम करणार

अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे या दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. रोहन पाटील याने याचा ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रोहन पाटीलने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली होती. आता नव्या सिनेमाच्या माध्यामातून रोहन पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिनेमात कोण- कोण कलाकार?

शहरातील प्रेमकहाणीला डोळ्यासमोर ठेवून आता खेड्यापाड्यातही याचं प्रमाण वाढलेलं चित्र दिसत आहे. अशावेळी समाजाकडून होणारा विरोध, कुटूंबाकडून मिळणारा नकार आणि यावेळी प्रेमीयुगुलांनी घेतलेला निर्णय याचे हुबेहूब वर्णन राजाराणी या चित्रपटातून लवकरच पाहायला मिळणार आहे. अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. याशिवाय भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे, सूरज चव्हाण या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलंआहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.