Rinku Rajguru | लॉकडाऊनचा ‘आर्ची’ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली

रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे लंडनला शूटिंग करत आहेत

Rinku Rajguru | लॉकडाऊनचा 'आर्ची'ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 9:14 AM

मुंबई : ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात लोकप्रिय झालेली ‘आर्ची’ सध्या लंडनमध्ये अडकली आहे. ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त इंग्लंड दौऱ्यावर असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुला (Rinku Rajguru) लॉकडाऊनचा फटका बसला. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रिंकूला लंडनमध्येच थांबून राहावे लागत आहे. रिंकूसोबत ‘छूमंतर’ सिनेमाची टीमही इंग्लंडमध्येच आहे. (Sairaat Actress Rinku Rajguru stuck in London due to Second Corona strain Lockdown in UK)

समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ सिनेमाचे चित्रिकरण इंग्लंडमध्ये सुरु आहे. यामध्ये रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, ‘नाळ’ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे शूटिंग करत आहेत. गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होते.

आर्चीची पहिली इंटरनॅशनल ट्रीप

रिंकू राजगुरुची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे. “मुंबई ते लंडन प्रवासादरम्यान मी प्रचंड एक्साईट होते. विमानतळांवर कोरोनापासून बचाावासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.” अशी प्रतिक्रिया रिंकूने दिल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळालं. रिंकूने सोशल मीडियावरही काही फोटो शेअर केले आहेत.

(Sairaat Actress Rinku Rajguru stuck in London due to Second Corona strain Lockdown in UK)

लॉकडाऊनमुळे अनेक मोठे अभिनेते-अभिनेत्री इंग्लंडमध्ये अडकले आहेत. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या इंग्लंडमध्ये आहे. याशिवाय अभिनेता संतोष जुवेकरही लॉकडाऊनमुळे लंडनमध्येच अडकला आहे.

संतोष जुवेकरचं आवाहन

“24 नोव्हेंबरला डेट भेट चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी लंडनला आलो. सिनेमाचं शूटिंग व्यवस्थित पार पडलं. सगळे जण आपापल्या घरी पोहोचले, पण मी इथे थांबलो. मला काही मित्रांना भेटायचं होतं आणि वैयक्तिक कामंही होती. 22 डिसेंबरला माझं परतीचं तिकीट होतं, मात्र ते रद्द झालं आहे. कारण लंडनमध्ये लॉकडाऊन सुरु झाला आहे. टिअर फोर आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडला आहे, जो नेहमीच्या कोरोनापेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. मी माझी व्यवस्थित काळजी घेत आहे, अजून तरी सुरक्षित आहे आणि देवाच्या कृपेने पुढेही राहीन, अशी खात्री आहे. आपण सगळेच सुरक्षित राहू, देव सगळ्यांचंच रक्षण करो, अशी प्रार्थनाही देवाकडे करतो.” अशी माहिती अभिनेता संतोष जुवेकरने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत दिली.

“31 डिसेंबरपर्यंत फ्लाईट बंद आहेत. ती कधी सुरु होतील माहिती नाही. पण भारत आणि महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. तो सगळ्यांच्या काळजीसाठी, सुरक्षिततेसाठी आहे. माझ्या काही मित्रांचे फोन आले, मुंबईत काही नाही, पण तुम्ही गाफील राहू नका, संकट अजून टळलेलं नाही. काळजी घेणं सुरक्षित आणि दक्ष राहणं गरजेचं आहे” असं आवाहनही संतोष जुवेकरने फेसबुकवर केलं.

संबंधित बातम्या :

Photo : अग्ग बाई! हातात चुडा, नाकात नथ; रिंकू राजगुरुचा खास मराठमोळा लूक

रिंकू राजगुरुच्या चाहत्यांसाठी Good News, ‘या’ हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

(Sairaat Actress Rinku Rajguru stuck in London due to Second Corona strain Lockdown in UK)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.