Gadad Movie Poster launch : ‘गडद’चं मोशन पोस्टर लाँच, अंडरवॉटर शूट होणारा पहिला मराठी सिनेमा

नेहमीच नवनवीन प्रयोग करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत आणखी एक नवा प्रयोग केला जाणार आहे. मराठी सिनेमांमध्ये प्रेक्षकांना प्रथमच स्कूबा डायव्हिंग पहायला मिळणार आहे. अंडरवॉटर शूट केलेला सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे.

Gadad Movie Poster launch : 'गडद'चं मोशन पोस्टर लाँच, अंडरवॉटर शूट होणारा पहिला मराठी सिनेमा
'गडद'चं मोशन पोस्टर लाँचImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 5:48 PM

मुंबई : नेहमीच नवनवीन प्रयोग करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत आणखी एक नवा प्रयोग केला जाणार आहे. मराठी सिनेमांमध्ये प्रेक्षकांना प्रथमच स्कूबा डायव्हिंग (Scuba Diving) पहायला मिळणार आहे. अंडरवॉटर शूट केलेला सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे. हॉलिवूड तसंच बॅालिवूड चित्रपटांमध्ये आपण यापूर्वी स्कूबा डायव्हिंग पाहिलं आहे, पण ‘गडद’ या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं ते प्रथमच मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहे. ‘गडद’ (Gadad) या चित्रपटाचं लक्ष वेधून घेणारं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. याप्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले (Meghraj Rajebhosale), चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद’च्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

दिग्दर्शक प्रज्ञेश कदम या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, लेखनही त्यांनीच केलं आहे. प्रज्ञेशचा हा दिग्दर्शकाच्या रूपातील पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच त्यांनी स्कूबा डायव्हिंगसह शूटिंग करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर लगेचच मालदिव्ज आणि गोव्यात शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना पाण्याखालचा गडद रंग पहायला मिळणार आहे. चित्रपटाचं शीर्षक आणि रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरवरून यात नेमकं कशा प्रकारचं कथानक पहायला मिळणार याचा जराही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळं या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या मराठीत सुरू असलेल्या ट्रेंडपेक्षा ‘गडद’ हा चित्रपट आपले काहीसे वेगळे रंग दाखवणार असल्याचे संकेत मात्र पोस्टरवरून नक्कीच मिळतात.

मिताली मयेकर, सुयोग गोऱ्हे, शुभांगी तांबाळे, नितीन गावंडे आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. संगीत रोहित श्याम राऊतचं आहे, तर सिनेमॅटोग्राफी वेंकटेश प्रसाद करणार आहे. मंदार लालगे आणि नितीन गावंडे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर असून, प्रवीण वानखेडे कार्यकारी निर्माते आहेत. अभिषेक खणकर यांनी ‘गडद’साठी गीतलेखन केलं असून, आदिनाथ पोहनकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. कॅास्च्युम किरण बुराडे यांनी केले आहेत.

संबंधित बातम्या

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे का? नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न

Sher Shivraj: ‘शेर शिवराज’ची टीम प्रतापगडावर; ढोल-ताशांच्या गजरात केलं कलाकारांचं स्वागत

Nave Lakshya: ‘नवे लक्ष्य’ मालिकेत अदिती सारंगधर, श्वेता शिंदे पुन्हा साकरणार गाजलेली भूमिका

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.