Amravati film | अमरावतीच्या भूमीत तयार झालेला सुलतान शंभू सुभेदार आजपासून महाराष्ट्रात सगळीकडे

आईचे बोल ऐकायला लागतात, परधर्माचे पोर आपल्या घरात नाही वाढू देणार. तिकडे प्रेयसीच्या कानी ही गोष्ट जाऊन थडकते. बस्स! जोपर्यंत या मुलाला त्याच्या घरी अथवा इतर कुठेही सोडून येत नाहीस तोपर्यंत आपले लग्न होणे नाही.

Amravati film | अमरावतीच्या भूमीत तयार झालेला सुलतान शंभू सुभेदार आजपासून महाराष्ट्रात सगळीकडे
अमरावतीच्या भूमीत तयार झालेला सुलतान शंभू सुभेदार आजपासून महाराष्ट्रात सगळीकडे
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 10:18 AM

अमरावती : सुलतान (Sultan) हा तीन वर्षांचा असताना मुले चोरणाऱ्यांच्या जाळात अडकतो. दैव चांगले म्हणून शंभू सुभेदार (Shambhu Subhedar), जो रिक्षाचालक (rickshaw puller) असतो, त्याच्या नजरेस ही गोष्ट पडते. तो नजरअंदाज न करता, त्या गुंडाचा पाठलाग करून त्या चिमुकल्यास वाचवायचे ठरवतो. त्या बिच्चाऱ्या निरागस पोराला, आपल्या जीवनात काय घडतंय याची कल्पनाच नसते. पण अनोळखी चेहऱ्यांमुळे तो पार गोंधळून गेलेला आहे. मुझे, मेरे बाप या अम्माके पास पहुचाँ दो, हाच आक्रोश त्याच्या तोंडी सतत सुरू असतो. गुंडाशी हातापायी करताना, सुल्तानच्या या हृदयद्रावक आर्ततेने शंभू सुभेदाराला अजून चेव चढतो. तो जीव पणाला लावून सुल्तानची, गुंडांच्या तावडीतून सुटका तर करतो खरा, पण आता मोठी पंचायत त्याच्यासमोर येऊन उभी रहाते. ती ही की, याचे पालक कोण? कुठे रहात असतील? त्या मुलाचे वय, हे सर्व काही सांगू शकेल या परिपक्वतेचे झालेले नसल्याकारणाने, तो आपल्याच घरी सुल्तानला घेऊन जायचा विचार पक्का करतो. रिक्षात बसवून घरी हजर. आता वस्तीतले येता जाता विचारू लागतात, क्या भानगड क्या है??? शादिके पहलेही……

पोरगा हुशार निघतो…

आईचे बोल ऐकायला लागतात, परधर्माचे पोर आपल्या घरात नाही वाढू देणार. तिकडे प्रेयसीच्या कानी ही गोष्ट जाऊन थडकते. बस्स! जोपर्यंत या मुलाला त्याच्या घरी अथवा इतर कुठेही सोडून येत नाहीस तोपर्यंत आपले लग्न होणे नाही. तिकडे, सुल्तानच्या अब्बूजान अब्दुल्ला यांनी म्हणजे वडिलांनी पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार केलेली असते. इकडे सुल्तान, तर शंभूच्या लाडप्यार करण्यावरच भारावून जाऊन शंभूलाच आपला बाप मानायला लागतो. दोघांचेही एकमेकांवर जीव जडलेले असतात. आता शंभू कात्रीत सापडतो. एकीकडे प्रेयसी तर दुसरीकडे हे पोरग. इकडे आड तिकडे विहीर अशी मनस्थिती. मनात काहूर माजलेले. सगळीकडून विवंचना. शेवटी, सर्व विरोधांना न जुमानता, शंभू पोराला आपले नाव देण्याचा निर्णय पक्का करतो. नामकरणावर शिक्कामोर्तब होते. सुलतान शंभू सुभेदार. शालेय जीवनाला सुरुवात होते. पोरगा हुशार निघतो…….

यांचा आहे सहभाग

13 मे 2022 रोजी आपल्या जवळच्याच सिनेगृहात जाऊन हा चित्रपट पहायला विसरू नका. चित्रपटाचे नाव आहे, सुल्तान शंभू सुभेदार. ही एक सत्य घटनेवर आधारित ॲड. प्रशांत भेलांडेंची कथा आहे. यश गिरोळकर, दिगंबर नाईक, किशोर महाबोले, देवेंद्र कपूर, सुप्रिया बर्वे व ज्योती निसळ, सुरेन्द्रकुमार आकोडे यासारख्या दर्जेदार कलाकारांच्या अदाकारीने भूमीकाही तितक्याच समरस होऊन वठल्या आहेत. छान तालबद्ध, सूरबद्ध श्रवणीय संगीत दिले आहे, श्री अरविंद हसबनीस यांनी. दिग्दर्शन, संवाद व पटकथा, डॉ. राजन माने यांनी. सतत उत्कंठावर्धक असेल याची सर्वतोपरीने काळजी घेतली आहे. हा चित्रपट, यश असोसिएट्स अँड मुव्हिजचे कैलास गिरोळकर यांची प्रस्तुती आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.