Sher Shivraj Hai : ‘शेर शिवराज है’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।..तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है।‘ (The movie 'Sher Shivraj Hai' will be releasing soon)

Sher Shivraj Hai : 'शेर शिवराज है' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 6:11 PM

मुंबई : ‘इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है।’ हे कवी भूषण यांच्या लेखणीतून अवतरलेले छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणारे काव्य बऱ्याच शिवभक्तांना मुखोदगत आहे. या अजरामर स्तुतीकाव्याचा इथं उल्लेख करण्यामागं एक विशेष कारण आहे. या काव्यातील ‘शेर शिवराज है’ हे ध्रुवपद आता एका मोठ्या मराठी सिनेमाचं शीर्षक बनलं आहे. दिग्दर्शनाकडे वळल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील वेगवेगळे टप्पे चित्रपटरुपानं जनतेसमोर आणणारा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटाचं शीर्षक ‘शेर शिवराज है’

दिग्पालच्या याच चित्रपटाचं शीर्षक ‘शेर शिवराज है’ असं आहे. शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगभरातील बऱ्याच देशांच्या सैन्य दल अभ्यासक्रमांमध्ये अफझलखानाचा वध प्रकरणाचा समावेश असून, यातील शिवरायांच्या रणनीतीचे प्रशिक्षण सैनिकांना दिलं जातं. गनिमी काव्यानं लढलेल्या या युद्धातील विविध कंगोरे सैनिकांना समजावून सांगितले जातात. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ हा सिनेमा मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरने अर्काइव्ह करण्याची प्रोसेस केल्यानंतर सैन्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांशी दिग्पालचा संपर्क आला.

शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका 

शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे, यातील ‘शेर शिवराज है’ हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या सिनेमाची जोरदार तयारी करत आहे. आठ चित्रपटांपैकी ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांचे दिग्पाल आणि त्याच्या टीमनं उत्तम सादरीकरण केलं असून, ‘जंगजौहर’ हा तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमाबाबत सर्वांनाच खूप कुतूहल आणि उत्सुकता आहे. ही गोष्ट नक्कीच उत्साह वाढवणारी असल्याचे दिग्पालचे मत आहे.

दिग्पालकडून खूप अपेक्षा

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘जंगजौहर’ या सिनेमांमुळे रसिकांच्या दिग्पालकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दिग्पाल ‘शेर शिवराज है’ या चित्रपटासाठी खूप अभ्यास आणि रिसर्च करत आहे. अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. दिग्पालनं आपल्या सिनेमांमधून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘फर्जंद’ या सिनेमात शिवराय मार्गदर्शकाच्या रूपात होते तर ‘फत्तेशिकस्त’मध्ये स्वत: मैदानात उतरुन नेतृत्व करताना रणनीतीज्ञाच्या भूमिकेत दिसले.

लवकरच झलक पाहायला मिळणार

उत्तम मानसशास्त्र जाणणारा रणनीतीज्ञ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेच रूप ‘शेर शिवराज है’ या चित्रपटात सादर करण्याचा प्रयत्न दिग्पाल करणार आहे. रयतेसाठी कनवाळू, श्रद्धा असलेला राजा ही जनतेच्या मनातील छत्रपतींची रुपेही प्रामुख्याने या सिनेमाद्वारे समोर येतील. त्याचबरोबर महाराजांचे भौगोलिक ज्ञान किती उत्तम होते हे देखील ‘शेर शिवराज है’ या सिनेमात पहायला मिळेल. या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झालेली असून, लवकरच निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दिग्पाल सध्या ‘शेर शिवराज है’ सिनेमाचे पहिले पोस्टर व टीझरही लवकरच रसिकांच्या भेटीला आणण्याच्या तयारीत आहे. दिग्पालची आजवरची कामगिरी पाहता ‘शेर शिवराज है’ या सिनेमाशी संबंधित असलेल्या आणखी काही गोष्टी जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतील पण त्यासाठी सर्वांनाच थोडी वाट पहावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

Marathi Serial : महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी मालिका,‘नवे लक्ष्य’… नाती अनेक वर्दी एक

Mangalashtak Return : अखेर ‘त्या’ सोहळ्याचं गुपित उघड, ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटाची घोषणा

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.