उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशी यांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Upendra Limye and Jitendra Joshi New Movie : अभिनेता जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये या जोडीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं चित्रिकरण केलं जात आहे. 'बंधू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाचा सविस्तर...

उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशी यांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार...
उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 7:14 PM

अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बंधू’ सिनेमाचं शुटिंग सध्या सुरु झालंय. ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाई मध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे. ‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’ च्या यशानंतर लेखक – दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. ‘

अॅनिमल या हिंदी चित्रपटानंतरच्या यशानंतर आता ‘ बंधू ‘ या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून उपेंद्र लिमये हा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच असं त्याला टॅगलाईन देण्यात आलं आहे. यावरुनच ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आहे हे आपल्याला समजते. लवकरच भावांमधील ही अनोखी प्रेमकथा आपल्या भेटीला येणार आहे.

चित्रिकरणाला सुरुवात

सान्वी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाई मध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला.यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच आता लवकरात लवकर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाची गोष्ट काय?

मी नेहमीच सामाजिक आरोग्य सुधरवणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. समाजाच्या आरोग्याचं नुकसान होईल अशा आशयाचे चित्रपट मी हाताळत नाही. या आधी मी पती – पत्नीवर आधारित चित्रपट केले आहेत. आता ‘बंधू’ च्या निमित्ताने मी भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.आताच्या सोशल मिडिया आणि स्पर्धात्मक युगामध्ये नाती दूर होत चालली आहेत. त्यामुळे भावाभावांच्या नात्यावर भाष्य करणे मला गरजेचे वाटले. दुरावलेली नाती प्रेमाच्या ओल्याव्याने कशी जवळ येतात हे ‘बंधू’ या चित्रपटात दाखविण्यात आले आहे, असं  लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी सांगितलं.

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे असून निर्माती आरती चव्हाण या आहेत. कार्यकारी निर्माता विनोद नाईक आहेत. तर प्रोजेक्ट हेड वैभव शिरोळकर आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून हर्षद आत्माराम गायकवाड हे लाभले आहेत. संगीत विजय नारायण गावंडे यांचे आहे. तर गीतरचनेची धुरा गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक नितीन गणपत बोरकर हे आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.