Video | ‘वाजले की बारा’ म्हणणारी अमृता खानविलकर अशी ठेवते स्वतःला फिट! पाहा तिचा योगा व्हिडीओ…

‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते.

Video | ‘वाजले की बारा’ म्हणणारी अमृता खानविलकर अशी ठेवते स्वतःला फिट! पाहा तिचा योगा व्हिडीओ...
अमृता खानविलकर
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 3:35 PM

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जगात कोरोना विषाणूची एंट्री झाली आणि अवघ्या विश्वाची घडीच विस्कटली. आधीच इतर समस्यांशी दोन हात करताना आपल्या शरीराकडे लक्ष देणे काहीसे कमी होत होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सगळ्यांनीच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत सगळेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे. या मोहिमेत ‘वाजले की बारा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकही सामील झाली आहे (Vajale Ki Baara fame Actress Amruta Khanvilkar share yoga fitness tips on social media).

फिट राहण्यासाठी अनेक कलाकार, सेलिब्रिटी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. फिटनेस रुटीन त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. चंदेरी दुनियेत चमकण्यासाठी आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व उजळवण्यासाठी जिम, व्यायाम, योगा यांना प्राधान्य दिले जाते. इतकेच नाही, तर या सगळ्याबरोबरच त्यांचे त्यांच्या आहारावरही पुरेपूर लक्ष असते. रोज न चुकता वर्क आऊट करण्यावर या सगळ्या कलाकारांचा जोर असतो.

अमृताचा योगा क्लास!

‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते. वर्क आऊट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो. नुकताच अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्याप्रमाणेच आपल्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी दिवसाची सुरुवात योगाने करावी यासाठी तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता स्वतःला फिट ठेवण्यासाठी विविध योगासनं करताना पाहायला मिळतेय (Vajale Ki Baara fame Actress Amruta Khanvilkar share yoga fitness tips on social media).

पाहा व्हिडीओ :

(Vajale Ki Baara fame Actress Amruta Khanvilkar share yoga fitness tips on social media).

कॅप्शनही खास!

‘अशी एकतरी गोष्टी असावी तिच्याकडे तुम्ही पुन्हा कधीही येऊ शकता आणि ती फक्त आणि फक्त तुमचीच असेल. तुम्ही कदाचित सर्वांसोबत बसाल, मजा कराल, थोडा वेळ घालवाल पण त्या एका गोष्टीला नेहमी सांभाळाल. जिच्यावर तुमचा विश्वास आहे. परत येणं हे कायमच चांगलं असंत’, असे कॅप्शन अमृताने या व्हिडीओला दिले आहे. याआधी देखील योगा केल्याने फक्त फिटनेस नाहितर मानसिक स्वास्थही चांगले झाल्याचे अमृताने सांगितले आहे.

अमृताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. तिचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा याने देखील अमृताचे कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय अमृता!

अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही, तर ‘खतरोंके खिलाडी’मध्येसुद्धा तिने जोरदार प्रदर्शन केले. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. ‘जिवलगा’ या मालिकेनंतर आता पुन्हा अमृता कधी दिसणार?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

(Vajale Ki Baara fame Actress Amruta Khanvilkar share yoga fitness tips on social media)

हेही वाचा :

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!

Rang Maza Vegla | ऑन स्क्रीन वैर, मात्र ऑफ स्क्रीनवर धमाल, पाहा डॉक्टर कार्तिक आणि श्वेताचा डान्स!

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.