महिला सशक्त व्हायला हव्यात, गुन्हा घडण्यापूर्वी कायद्याची शिक्षेची भीती वाटायला हवी : अलका कुबल

ज्याप्रकारे सौदी मध्ये कठोर शिक्षा होतात, तशाच शिक्षा भारतात झाल्यास महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भीती वाटेल, असे वक्तव्य अभिनेत्री अलका कुबल यांनी केले आहे. सिने क्षेत्रात अनेकदा एका बाजूने चूक नसते, कधी कधी समोरच्याची असते, ती बाजूही विचारुन घेतली पाहिजे,  तसेच त्यांना शिक्षा होणे देखील गरजेचे आहे.

महिला सशक्त व्हायला हव्यात, गुन्हा घडण्यापूर्वी कायद्याची शिक्षेची भीती वाटायला हवी : अलका कुबल
Alka Kubal
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 12:02 PM

उस्मानाबाद : ज्याप्रकारे सौदी मध्ये कठोर शिक्षा होतात, तशाच शिक्षा भारतात झाल्यास महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भीती वाटेल, असे वक्तव्य अभिनेत्री अलका कुबल यांनी केले आहे. सिने क्षेत्रात अनेकदा एका बाजूने चूक नसते, कधी कधी समोरच्याची असते, ती बाजूही विचारुन घेतली पाहिजे,  तसेच त्यांना शिक्षा होणे देखील गरजेचे आहे. सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी उस्मानाबाद येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

महिला सशक्त व्हायला हव्यात व गुन्हा घडण्यापूर्वी गुन्हेगार कायद्याची शिक्षेची भीती वाटायला हवी. मुलगा मुलगी समान ही वैचारिकता घरातुन बदलायला हवी, भेदभाव कमी होणे गरजेचे आहे, असे देखील त्या म्हणाल्या. 90 टक्के तरुण पिढी सुशिक्षित आणि चांगली आहे. मात्र, कायदे कडक व्हायला हवे. मी सुद्धा 2 मुलींची आई आहे, मुलं संगत कोणाची करतात यावर लक्ष देणे ही जबाबदारी पालकांची आहे, असे देखील अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम येथे कुबल यांच्या हस्ते 11 मुलींना सुकन्या योजनेचे खाते उघडून ते भेट म्हणून दिले.

कठोर शिक्षा झालीच पाहिजे!

मनोरंजन विश्वातही अपराध घडतात, पण अशावेळी दोन्ही बाजू जाणून घ्यायला हव्यात. जो चूक आहे त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. आपल्या कायद्याची भीती सगळ्यांना वाटली पाहिजे. कुठलीही गोष्ट घडण्यापूर्वी कायद्याचा वचक सगळ्यांना बसला पाहिजे. सुकन्या समृद्धी सारखी योजना मुलीना भविष्यात खूप बळ देईल. अशा कामना आपण पाठींबा दिला पाहिजे आणि हातभार लावला पाहिजे.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची घोषणा देणाऱ्या मोदी सरकारने नागरिकांच्या (Sukanya Samriddhi Yojana) भल्यासाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे सुकन्या योजना आहे. ही योजना  विशेषकरुन त्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे, जे थोडी-थोडी बचत करुन आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतात (Sukanya Samriddhi Yojana).

या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे शेअर बाजाराप्रमाणे खाते नाहीत, त्यामुळे आपले पैसे येथे सुरक्षित राहतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर सूटही मिळते.

घरी मुलीचा जन्म होताच ती 10 वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत खातं उघडता येईल. कुठल्याही पोस्ट ऑफीसमध्ये किंवा कमर्शिअल ब्रांचच्या अधिकृत शाखेत खातं उघडता येतं. जर तुम्ही शेअर मार्केटच्या धोक्यापासून दूर राहू इच्छिता आणि फिक्स्ड डिपॉझिटमधील कमी व्याजापासून चिंतेत असाल तर तुम्ही येथे गुंतवणूक करु शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडल्यानंतर तुमची मुलगी 21 वर्षांची होतपर्यंत किंवा 18 वर्षांनंतर तिचं लग्न होईपर्यंत सुरु ठेवू शकता. यामध्ये खातं उघडल्याच्या दिवसापासून ते 15 वर्षांपर्यंत तुम्ही पैसे जमा करु शकता.

हेही वाचा :

Gandhi Jayanti 2021: ‘लगे रहो मुन्ना भाई’ पासून ते ‘गांधी माय फादर’ पर्यंत, गांधीजींच्या जीवनावर आधारित ‘हे’ चित्रपट देतील प्रत्येकाला प्रेरणा

Happy Birthday Kay Kay Menon | जाहिरात कंपनीसाठी काम करायचे के के मेनन, असा सुरु झाला होता चित्रपटसृष्टीतील प्रवास…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.