Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE | ‘सरसेनापती हंबीरराव’च्या कलाकारांची तारेवरची कसरत, भर पावसात शूटिंग पूर्ण

‘सरसेनापती हंबीरराव’ (sarsenapati hambirrao) या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

EXCLUSIVE | 'सरसेनापती हंबीरराव'च्या कलाकारांची तारेवरची कसरत, भर पावसात शूटिंग पूर्ण
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 2:40 PM

मुंबई : अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Marathi Film sarsenapati hambirrao) या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्याने त्यांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण ठप्प झाले होते.(Marathi Film sarsenapati hambirrao shoot completed)

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे चित्रीकरण थांबवावे लागले होते. या बाकी राहिलेल्या चित्रीकरणाला सात महिन्यांनातर परवानगी मिळाली. यासाठी भोर येथे नव्याने भव्य सेट उभारण्यात आला, सर्व तयारी झाली, शूटिंगला सुरुवात झाली आणि पावसाने जोरदार हजेरी लावत परत एकदा व्यत्यय आणला. मात्र ‘सरसेनापती हंबीरराव’ च्या लढाऊ मावळ्यांनी आलेल्या संकटाशी दोन हात करत नियोजित चित्रीकरण मोठ्या जिद्दीने पूर्ण केले.

महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याला पावसाची हजेरी

पावसाबरोबर यशस्वी मुकाबला करत चित्रीकरण पूर्ण करताना दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, ‘6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी पहाटे पाऊस पडला होता. आज शिवराज्याभिषेक सोहळा चित्रित करतानाही पाऊस पडत आहे, या पावसामुळे चित्रीकरणात व्यत्यय निर्माण झाला. तरी आम्ही ही बाब सकारात्मक म्हणून बघतो.’(Marathi Film sarsenapati hambirrao shoot completed)

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

याविषयी बोलताना निर्माते संदीप मोहिते-पाटील म्हणाले, लॉकडाऊन मुळे तीन दिवसांचे शूटिंग  बाकी होते. परवानगी मिळाल्यानंतर शूटिंग सुरू केले. मात्र ऐन चित्रीकरणाच्या वेळी वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भव्य सेटचे मोठे नुकसान झाले असले, तरी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, डिओपी महेश लिमये, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, देवेंद्र गायकवाड, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह संपूर्ण टीम या संकटाशी यशस्वीपणे झुंजली आणि नियोजित शूटिंग वेळेत पूर्ण केले ही बाब आमचा उत्साह वाढवणारी आहे. आता पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण करून ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट प्रदर्शनासाठी आम्ही तयार ठेवणार आहोत.

(Marathi Film sarsenapati hambirrao shoot completed)

View this post on Instagram

जणू सह्याद्रीचा कडा , श्वास रोखुनी खडा …

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde) on

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.