‘सैराट’मधील इनामदार वाडा आला पाण्याबाहेर, पर्यटकांची गर्दी वाढली; वाड्याबाबतचं रहस्य काय ?
मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलही भुरळ घालणारा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे यांचा 'सैराट'.. कहाणी, गाणी, अभिनय, कलाकार,सर्वच स्तरावर यशस्वी ठरलेल्या या चित्रपटातील 'सैराट झालं जी' हे गाणंही तितकंच गाजलं. याच गाण्यातील एका दृश्यात, सूर्यास्तावेळचा एक शॉट आहे, त्यामध्ये दिसलेला इनामदार वाडाही खूप लोकप्रिय झाला.
मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलही भुरळ घालणारा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’.. कहाणी, गाणी, अभिनय, कलाकार,सर्वच स्तरावर यशस्वी ठरलेल्या या चित्रपटातील ‘सैराट झालं जी’ हे गाणंही तितकंच गाजलं. याच गाण्यातील एका दृश्यात, सूर्यास्तावेळचा एक शॉट आहे, त्यामध्ये दिसलेला इनामदार वाडाही खूप लोकप्रिय झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन इतकी वर्ष झाली तरी हा वाडा अजूनही खूप लोकप्रिय असून तो पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. चारशे वर्षांपूर्वीच्या या वाड्याची आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने व उजनी धरण वजा पातळीत गेल्याने धरणाच्या पाण्यात लुप्त झालेला इनामदार बंधूंचा भव्य दिव्य वाडा दिसू लागला आहे. इनामदार बंधूंचा आकर्षक वाडा इतिहास व निसर्ग प्रेमींसाठी पर्वणीच ठरला आहे.सैराट चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाल्यानंतर हा वडा आणखीच प्रकाश होतात आला होता.
छत्रपती शिवरायांशी निगडीत वाड्याचा इतिहास
हा वाडा सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या पराक्रमाने बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला होता.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूंचा बंदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीराजांवर सोपवली होती. त्यावेळी असणारे मालोजीराजे भोसले यांनी भीमा नदीकाठच्या कुगाव ठिकाणी सैन्यांना रसद, तसेच शस्त्रास्त्रे मिळण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा किल्ला बांधला. हा किल्ला पुढे ब्रिटीश सरकारने इनामात 1893 साली यशवंत मेघश्याम इनामदार यांच्याकडे देण्यात आला. या किल्ल्याला इनामदार वाडा असेही म्हटले जाते.
या ठिकाणी नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटातील काही प्रसंग चित्रित केले होते त्यामुळे हा किल्ला पर्यटकांसमोर आला. सैराट चित्रपटाने सर्वांनाच सैराटमय करून सोडले होते. चित्रपटातील लोकेशन, त्यामधील गाणी सर्वच अविस्मरणीय असून त्यामध्ये आर्ची आणि परश्याचे निरागस प्रेम ज्या ठिकाणी फुलले ते ठिकाण म्हणजे इनामदारवाडा. मात्र आता हा वाडा पाण्याबाहेर आला आहे. सैराट सिनेमातील सूर्यास्तावेळीचे सैराट झालं जी गाणे याठिकाणी शूट झाले होते. मात्र तो पाण्याखाली गेला होता.
पण आता उजनी धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने व उजनी धरण वजा पातळीत गेल्याने धरणाच्या पाण्यात लुप्त झालेला इनामदार बंधूंचा भव्य दिव्य वाडा दिसू लागला आहे.भीमा नदीतीरावर बांधलेला हा भव्य वाडा उजनी धरणातील कुगाव येथे आहे. धरण भरल्यावर तो पूर्ण पाण्याखाली जातो. आता उजनी धरण बर्यापैकी आटल्याने लोकांना आता इथं जाणं सहज शक्य झालं. धरणातील पाणी आटल्यावर इथून विस्थापित झालेले लोक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आवर्जून इथं येत असतात. त्यामुळे या वाड्याला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.