VIDEO | पाठकबाईंच्या ‘मधाळ’ आवाजाची जादू, अक्षया देवधरचं ‘कभी नीम नीम…’ ऐकलंत?

अक्षया देवधरच्या आवाजात 'कभी नीम नीम कभी शहद शहद' हे प्रसिद्ध गाणं रिलीज झालं आहे. (Akshaya Deodhar Kabhi Neem Neem)

VIDEO | पाठकबाईंच्या 'मधाळ' आवाजाची जादू, अक्षया देवधरचं 'कभी नीम नीम...' ऐकलंत?
Akshaya Deodhar
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 9:17 AM

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली आहे. अंजली अर्थात पाठकबाईंच्या भूमिकेमुळे अक्षयाच्या अभिनयाचं अंग प्रेक्षकांनी पाहिलं आहे. मात्र आता अक्षयाचा गाता गळाही चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. अक्षयाच्या आवाजात ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ हे प्रसिद्ध गाणं रिलीज झालं आहे. (Marathi TV Actress Akshaya Deodhar features in Kabhi Neem Neem Song rearranged by Tuningheart with Ifilmer)

‘कभी नीम-नीम, कभी शहद-शहद, कभी नरम-नरम, कभी सख्त-सख्त’ हे ए आर रहमान (A R Rehman) यांचे संगीत लाभलेलं गाणं चांगलंच लोकप्रिय आहे. प्रख्यात गायिका मधुश्री (Madhushree) यांच्या मधाळ आवाजातील गाण्याची मोहिनी अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या युवा (Yuva) चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. नुकताच या गाण्याला नवीन साज देण्यात आला.

युवा कलाकरांकडून गाण्याला नवा साज

स्वप्नील भावे आणि केतन पवार या कलाकारांनी ‘कभी नीम-नीम’ गाण्याचे नव्याने संगीत संयोजन केले आहे. अभिनेत्री अक्षया देवधरसोबत स्नेहल भावेने या गाण्याचे सूर छेडले आहेत. तर मुक्ता लेले हिने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. स्वप्नील भावे आणि केतन पवार यांनी स्नेहल भावेच्या साथीने व्होकल रिदम्सही गायले आहेत.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर सक्रिय अक्षया

अक्षया देवधर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. अक्षया सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, जिम ट्रेनिंग आणि व्यायामाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Akshaya Deodhar Kabhi Neem Neem)

हम है नये अंदाज क्यू हो पुराना?

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अक्षयाला कामातून उसंत मिळाली आहे. सध्या ती तिच्या मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसते. असाच मैत्रिणींसोबतचा एक व्हिडीओ अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. यामध्ये ती मैत्रीणींसोबत ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’ या गाण्यावर नाचताना दिसली होती.

संबंधित बातम्या 

Video | पाठक बाई रमल्या ‘तुझ्यात जीव रंगला’च्या आठवणीत, अक्षयाने शेअर केला ‘Nostalgia’ व्हिडीओ

Video | शिमरी साडी अन् डायमंड नेकलेस, ‘पाठक’बाईंच्या नव्या लूकला ग्लॅमरचा तडका! पाहा खास व्हिडीओ  

(Marathi TV Actress Akshaya Deodhar features in Kabhi Neem Neem Song rearranged by Tuningheart with Ifilmer)

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....