Aai Kuthe Kay Karte | अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, ‘आई कुठे…’मध्ये नवा ट्विस्ट

अभिषेकचा साखरपुडा अनघाशी होणार आहे. मात्र या साखरपुड्यात संजना आणि अंकिताच्या रुपाने माशी शिंकते की काय, अशी शंका आहे. (Aai Kuthe Kay Karte Arundhati Sanjana)

Aai Kuthe Kay Karte | अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, 'आई कुठे...'मध्ये नवा ट्विस्ट
Aai Kuthe Kay Karte
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 10:53 AM

मुंबई : प्रेक्षकांची आवडती मालिका ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख कुटुंब गावातील घरी राहायला गेले आहेत. आधी देशमुखांच्या घरात संजना येऊन धडकली असताना, आता अंकिताच्या रुपाने नवीन वादळ येणार आहे. त्यामुळे ऐन साखरपुड्यात ‘आई कुठे काय करते’मध्ये कोणता नवा ट्विस्ट निर्माण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte Arundhati slaps Sanjana during Abhi Anagha engagement as Ankita enters)

अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मालिकांचं शूटिंग सध्या राज्याबाहेर हलवण्यात आलं आहे. ‘आई कुठे काय करते’चं शूट सध्या सिल्व्हासा येथे होत आहे. मात्र देशमुख मंडळी मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आल्याचा बदल कथानकात करण्यात आला आहे. अनेक अडचणींनंतर अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा मोठा मुलगा डॉ. अभिषेकचा साखरपुडा अनघाशी होणार आहे. मात्र या साखरपुड्यात संजना आणि अंकिताच्या रुपाने माशी शिंकते की काय, अशी शंका आहे.

आधीच संजना गावी आल्यामुळे खुद्द अनिरुद्धपासून इशा, यश, आई, अप्पा, गौरी असे सगळेच वैतागले आहेत. अरुंधती हा प्रकार खपवून घेते, मात्र आमच्या आनंदावर विरजण टाकू नकोस असं तिला दटावते. इशाने संजनाच्या तोंडावर लिंबू सरबत फेकणं असो, किंवा अनिरुद्धच्या आईशी उडालेले खटके, संजनाशी कोणाचंच पटत नसल्याचं दिसतंय.

संजनाकडून अंकिताचं औक्षण

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभि-अनघाच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका फोटोत अंकिताच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये संजना अंकिताचं औक्षण करताना दिसते, तर एका फोटोत अरुंधती अभिषेकचा गळा धरताना दिसते. हे फोटो मालिकेचा भाग आहेत, की सेटवरील टाईमपास, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र मालिकेचा नवा प्रोमो नक्कीच उत्कंठा वाढवणारा आहे.

(Aai Kuthe Kay Karte Arundhati Sanjana)

काय आहे प्रोमो?

अभि-अनघाच्या साखरपुड्यावेळी अरुंधती संजनाला जाब विचारते की, अंकिताला अभिच्या साखरपुड्याविषयी तू सांगितलंस का. त्यावर “मी तिला हेच सांगितलं की अनिरुद्धने खूप प्रयत्न केला तुझा आणि अभिचं लग्न व्हावं म्हणून, पण अरुंधती…” असं संजना सांगत असतानाच अरुंधती तिच्या कानाखाली आवाज काढते. त्यानंतर चिडलेली अरुंधती “संजना, तू माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस, पण माझ्या मुलांच्या वाट्याला जायचं नाही” असं भर समारंभात तिला सुनावते.

संबंधित बातम्या :

‘बिग बॉस’मधील टशन ते टीव्हीवरची व्हिलन, बघा संजना रिअल लाईफमध्ये ‘कुठे काय करते!’

Video | सोज्वळ आईचा हटके लूक, अरुंधती-संजनाची ऑफस्क्रीन धमाल

(Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte Arundhati slaps Sanjana during Abhi Anagha engagement as Ankita enters)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.