Ravi Patwardhan | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले आहे. (Marathi Actor Ravi Patwardhan Passed Away)

Ravi Patwardhan | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:25 PM

मुंबई : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज (6 डिसेंबर 2020) निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (Marathi Actor Ravi Patwardhan Passed Away)

रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या अनेक भूमिकांमध्ये काम केले. रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटक तर 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली.

वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.

रिझर्व्ह बँकेत नोकरी

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.

वयानुसार येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला. त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला. त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला. (Marathi Actor Ravi Patwardhan Passed Away)

रवी पटवर्धन यांची काही गाजलेली नाटक

  • अपराध मीच केला
  • आनंद (बाबू मोशाय)
  • आरण्यक (धृतराष्ट्र)
  • एकच प्याला (सुधाकर)
  • कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान)
  • कोंडी (मेयर)
  • जबरदस्त (पोलीस कमिशनर)
  • प्रेमकहाणी (मुकुंदा)
  • बेकेट (बेकेट)
  • भाऊबंदकी
  • मला काही सांगायचंय (बाप्पाजी)
  • मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस)
  • विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर)

?रवी पटवर्धन यांचे चित्रपट? 

  • अंकुश (हिंदी)
  • अशा असाव्या सुना
  • उंबरठा
  • दयानिधी संत भगवान बाबा
  • ज्योतिबा फुले
  • झॉंझर (हिंदी)
  • तक्षक (हिंदी)
  • तेजाब (हिंदी)
  • नरसिंह (हिंदी)
  • प्रतिघात (हिंदी)
  • बिनकामाचा नवरा
  • सिंहासन
  • हमला (हिंदी)
  • हरी ओम विठ्ठला

?रवी पटवर्धन यांच्या गाजलेल्या मालिका?

  • अग्गंबाई सासूबाई झी मराठी मालिका
  • आमची माती आमची माणसं (शेतकऱ्यांसाठीचा दैनिक मराठी कार्यक्रम)
  • तेरा पन्‍ने
  • महाश्वेता
  • लाल गुलाबाची भेट

(Marathi Actor Ravi Patwardhan Passed Away)

संबंधित बातम्या : 

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेखकाची आत्महत्या, कुटुंबियांना वेगळाच संशय

Rahul Roy | ‘ब्रेनस्ट्रोक’मुळे राहुल रॉयच्या शरीराची डावी बाजू प्रभावित, कुटुंबियांचे चाहत्यांना आवाहन…

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.