मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न, या अभिनेत्रीला मिळाली भयानक शिक्षा; समाजानं वाळीत टाकलं, मंदिरातही प्रवेश नव्हता
प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या वीसाव्या वर्षी मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं. मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केल्यामुळे तिचं कुटुंब तिच्यापासून दुरावलं, कुटुंबानं तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले.
प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या वीसाव्या वर्षी मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं. मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केल्यामुळे तिचं कुटुंब तिच्यापासून दुरावं, कुटुंबानं तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. तारुण्यात प्रेम कितीही चांगलं वाटत असलं तरी लग्नानंतर काही वर्षांनी तो उत्साह मावळतो असंच काहीसं या अभिनेत्रीसोबत घडलं.या अभिनेत्रीनं मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केलं म्हणून तिच्या समाजातील लोकांनी तिच्या कुटुंबावर अनेक प्रतिबंध घातले. त्यामुळे त्यांना मंदिरात देखील प्रवेश दिला जात नव्हता. विशेष म्हणजे तिने आपल्यापेक्षा वयानं 18 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं, त्यानंतर तिचा घटस्फोट देखील झाला.
आता या 50 वर्षांच्या अभिनेत्रीला तिच्या पहिल्या पतीपासून एक तीस वर्षांची मुलगी देखील आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तनाज ईरानी आहे. तनाजने ‘कहो न प्यार है’, ’36 चाइना टाउन’अशा अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार अभिनय केला आहे.सध्या ती आपला दुसरा पती बख्तियार ईरानी यांच्यासोबत आपलं जीवन आनंदात जगत आहे. मात्र आजही जुन्या आठवणी अस्वस्थ करतात असं ती म्हणते.
तनाज ईरानीच्या पहिल्या पतीचं नाव फरीद कुरीम होतं, तनाजला तिचा पहिला पती फरीदपासून एक मुलगी देखील आहे.फरीद कुरीम हा देखील एक आर्टिस्ट होता. मात्र त्याचा धर्म वेगळा असल्यामुळे तनाजला ती ज्या समुदायामधून येते त्या पारशी समुदायाची नाराजी ओढून घ्यावी लागली. पारशी समुदायानं घातलेल्या बंधनामुळे तिला प्रार्थनास्थळामध्ये देखील प्रवेश मिळत नव्हता.दरम्यान आठ वर्षानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर तीने दुसरं लग्न केलं.
तीने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं की, मी मुस्लिम समाजातील मुलासोबत लग्न करावं असं माझ्या समाजाला कधीच वाटत नव्हतं. या लग्नाला पारशी समाजाचा विरोध होता. मात्र या विरोधात जाऊन मी माझ्या पहिल्या पतीसोबत लग्न केलं. तेव्हा त्याची शिक्षा म्हणून समाजाने तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले, तिचे सर्व अधिकार अमान्य केले, तिला पारशी समाजाच्या प्रार्थनास्थळी देखील प्रवेश दिला जात नव्हता.