बॉलिवूड मधील देखणा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) त्याच्या उत्कृष्ट फिटनेसमुळे चर्चेत राहतो. वयाच्या 56 व्या वर्षीही हा अभिनेता आपल्या फिटनेसबाबत कोणतीही निष्काळजीपणा करत नाही. फिटनेसच्या बाबतीत तो यंग स्टार्सनाही मात देतो. मिलिंद सोमण अनेकदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण यावेळी अभिनेत्याने आपली वेगळी शैली छायाचित्रांच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अलीकडेच मिलिंद सोमण पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) सोबत सुट्टीसाठी मालदीवला गेला होता. अभिनेत्याने त्याच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो अंकिता कोंवरसोबत अंडरवॉटर रोमान्स करताना दिसला होता.
शुक्रवारी मिलिंद सोमणने स्कूबा डायव्हिंग दरम्यान पाण्याखाली स्वतःचा आणि अंकिता कोंवरचा फोटो घेतला, ज्यामध्ये ते दोघं किस करताना दिसत आहेत. यासोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फर्स्ट किस…” दोघेही स्कूबा डायव्हिंग गियर आणि ॲक्सेसरीजमध्ये दिसले.
रिस्क है तो इश्क है
त्याने फोटो पोस्ट केल्यानंतर काही वेळातच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. एका चाहत्याने कमेंट केली की “पाण्याखाली चुंबन घेण्यासाठी त्यांनी ऑक्सिजन मास्क काढून टाकण्याचा धोका घेतला.” त्यावर दुसर्या युजरने “रिस्क है तो इश्क है” असे म्हटले. तर आणखी एका युजरने “हे खूप भीतीदायक आहे…” असे म्हटले. चौथ्या युजरने ” हे जोखमीचे काम आहे, पण तरीही सुंदर आणि रोमँटिक आहे.” अशी कमेंट केली आहे.
अंकिता कोंवर ही मिलिंद सोमणपेक्षा २६ वर्षांनी लहान आहे. सोशल मीडियावर दोघांची जोडी लोकांना खूप आवडते. त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलही करण्यात आले. या दोघांनी 2018 साली लग्न केले.