मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबतच (shahid kapoor) आता त्याची पत्नी मीरा राजपूतही (mira rajput) चर्चेत आहे. मीरा राजपूत देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे अशी चर्चा सुरू होती. पण ती चित्रपटांमध्ये नाही तर अनेक जाहिरातींमध्ये दिसली होती. शाहिदची पत्नी या इंडस्ट्रीतील नसून तिने ग्लॅमरच्या दुनियेनुसार स्वत:ला पूर्णपणे जुळवून घेतले आहे.
दरम्यान, मीराचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहिदची पत्नी खूपच सुंदर दिसत आहे. तिने क्रीमी व्हाईट आणि ब्लॅक कलरचा सुंदर पोशाख घातला आहे. मीरा राजपूत कोणत्याही मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. व्हिडिओमध्ये मीरा तिच्या घराकडे चालत जाताना दिसत आहे. पण त्याचे छायाचित्र काढण्यासाठी पापाराझी तिच्यासमोर होते. जे पाहून मीराने त्यांना विनंती केली.
मीराने फोटोग्राफर्सना सांगितले, माझ्या मुलांना उद्या सकाळी शाळेत जायचंय. तुम्ही मला प्लीज घरी जाऊ द्या. एकीकडे युजर्सना मीरा राजपूतची शिस्त आवडली, पण काहींनी अशी कमेंट केली मुलांना सध्या सुट्ट्या सुरू आहेत.
मीरा आणि शाहिद कपूर यांचे लग्न 2015 मध्ये झाले होते. या जोडप्याचे हे अरेंज मॅरेज होते. या दोघांना मीशा कपूर ही मुलगी आणि झेन कपूर हा मुलगा, अशी दोन अपत्ये आहेत.
गेल्या वर्षी शाहिद आणि मीरा मुंबईतील वरळी येथील त्यांच्या आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. शाहिद आणि मीरा अनेकदा लग्नापूर्वीच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना दिसतात. शाहिद प्रत्येक गोष्ट मीरासोबत शेअर करतो. मीरा आणि शाहिद ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. अनेक चाहते मीराच्या पदार्पणाची वाट पाहत आहेत. मीरा पडद्यावर लोकांची मने जिंकू शकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.