अभिनेत्री मिताली मयेकरचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे जवळपास सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील चाहत्यांसाठी ती सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिचा आतापर्यंत सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. मितालीचा हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
या फोटोमध्ये मितालीने हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. अवघ्या तासाभरात या फोटोला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.
'अनहोली' (Unholy) असं कॅप्शन देत मितालीने शॉवर घेतानाचा हा फोटो पोस्ट केला आहे. सॅम स्मिथचं 'अनहोली' हे गाणं तुफान गाजलं आहे. याच गाण्यावरून मितालीने कॅप्शन दिलं आहे.
मध्यप्रदेशमधील बांधवगढ इथलं लोकेशन तिने या फोटोला दिलं आहे. बांधवगढ नॅशनल पार्क फार प्रसिद्ध आहे आणि मितालीला जंगल सफारीची फार आवड आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्सचा वर्षाव केला आहे.