Mithun Chakraborty : ब्रेनस्ट्रोक नंतर कशी आहे मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत ? रुग्णालयातून हेल्थ अपडेट, नवी माहिती काय ?

Mithun Chakraborty Health update : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्याने ते रुग्णालयात असल्याची बातमी समोर आली होती. कलकत्ता येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता रुग्णालयातून त्यांच्या प्रकृती बाबत माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती कशी आहे ?

Mithun Chakraborty : ब्रेनस्ट्रोक नंतर कशी आहे मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत ? रुग्णालयातून हेल्थ अपडेट, नवी माहिती काय ?
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 7:34 AM

कलकत्ता | 12 फेब्रुवारी 2024 : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. बॉलिवूडमध्ये अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचे सोशल मीडियावरही लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याचे समजताच सर्वांना चिंता वाटू लागली. शनिवारी त्यांना बेचैन वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कलकत्ता येथील एका रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने . मिथुन चक्रवर्ती यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट शेअर केली आहे.

कशी आहे आता तब्येत ?

PTI नुसार, एका ऑफिशल अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की आता मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते स्टेबल आहेत. हूहळू ते ठीक होत असून त्यांना जेवणात केवळ सॉफ्ट डाएट देण्यात येत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांच्या काही टेस्ट्सही करण्यात येतील. शनिवारी त्यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांचे MRI करण्यात आले तसेच काही इतर वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या होत्या.

शनिवारी त्यांचे जे MRI झाले, त्यातून असे समजले की मिथुन चक्रवर्ती यांना सेरेब्रल वॅस्क्युलरएक्सीडेंट म्हणजेच ब्रेन स्ट्रोक आला होता. तपासणीनंतर त्यांना कार्डिओवॅस्क्युलर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती बरी असून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी त्यांच्या आणखी काही तपासण्या करण्यात येतील. मात्र त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. मिथुन चक्रवर्ती यांचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ रूग्णालयातील आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा हा नवा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मिथुन चक्रवर्ती हे दिसत असून ते बेडवर दिसत आहेत आणि बोलताना दिसत आहेत. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

350 हून अधिक चित्रपटात केलं काम

मिथुन चक्रवर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.