‘पुन्हा अलिबागचं नाव घ्याल तर खबरदार!’, आदित्य नारायणच्या ‘त्या’ संवादानंतर अमेय खोपकरांकडून कानउघडणी

सध्या सोनी टीव्हीचा 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे वादात अडकतो आहे. प्रेक्षकांकडूनही या कार्यक्रमावर मोठा आक्षेप घेतला जात आहे. इतर वाद सुरु असतानाच आता या शोचा होस्ट गायक आदित्य नारायण देखील मोठ्या वादात अडकला आहे.

‘पुन्हा अलिबागचं नाव घ्याल तर खबरदार!’, आदित्य नारायणच्या ‘त्या’ संवादानंतर अमेय खोपकरांकडून कानउघडणी
आदित्य नारायण, अमेय खोपकर
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 5:28 PM

मुंबई : सध्या सोनी टीव्हीचा ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे वादात अडकतो आहे. प्रेक्षकांकडूनही या कार्यक्रमावर मोठा आक्षेप घेतला जात आहे. इतर वाद सुरु असतानाच आता या शोचा होस्ट गायक आदित्य नारायण देखील मोठ्या वादात अडकला आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना आदित्य नारायण (Aditya Narayan) याने ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते. यावर आता समस्त अलिबागकरांनी आक्षेप घेत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar)  यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या (MNS Leader Amey Khopkar warns Aditya Narayan over his controversial statement over alibaug).

यानंतर आता अमेय खोपकर यांनी देखील आदित्य नारायण याच्या या वक्तव्यावर चांगलीच कान उघडणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आदित्यला आपल्या फेसबुक लाईव्ह सेशनमधून कडक शब्दांत त्याला समज देखील दिली आहे.

पाहा व्हिडीओ

(MNS Leader Amey Khopkar warns Aditya Narayan over his controversial statement over alibaug)

काय म्हणाले अमेय खोपकर?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले की, ‘आदित्य नारायण याच्या या वक्तव्याचा निषेध नक्कीच व्हायला पाहिजे. हिंदी वाहिनीवर असं सरळ म्हटलं जात. यांना अलिबागची संस्कृती माहीत नाही, यांना अलिबागची लोकं माहिती नाही. आमचं, या अलिबागकरांचं डोकं फिरलं तर हिंदीतली एक ही गोष्ट अलिबागमध्ये जाऊ देणार नाही.’(MNS Leader Amey Khopkar warns Aditya Narayan over his controversial statement over alibaug)

पुढे ते म्हणाले, ‘हा अलिबागकरांचा अपमान आहे. याचा आम्ही निषेध करतो. आताच माझं उदित नारायण यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना माझ्या भाषेत समजावले आहे. त्यांना हे देखील सांगितले की, हल्ली त्याच्या मुलाच्या आदित्यच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्याचा आगाऊपणा आणि उद्धटपणा वाढल्याच्या आणखी तक्रारी येत आहेत. अलिबागचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही! मी वाहिनीशी देखील संपर्क साधला आहे, त्यांना सांगितले आहे की, पुढच्या भागात त्यांना अलिबागकरांची जाहीर माफी मागावी लागेल.’

पुन्हा अलिबागचं नाव घ्याल तर खबरदार!

पुढे अमेय खोपकर म्हणाले की, ‘आम्ही आता या हिंदीवाल्यांसाठी एक पत्रकच काढणार आहोत. पुन्हा ‘हम अलिबागसे आये है क्या’ असे वाक्य ऐकू येऊ नये. पुन्हा असं झालं तर यावेळी पत्रक नाही काढणार, फेसबुक लाईव्ह नाही करणार, सरळ कानाखाली आवाज काढणार. ही वेळ आता शुटींग बंद करण्याची नाही, त्यामुळे फेसबुक लाईव्हमधून समाज दिली आहे. मात्र, त्यांना माफी ही मागावीच लागेल. मी माझ्यापरीने जे शक्य ते करेनच. आम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागाचा अपमान सहन करणार नाही! आदित्य नारायणला अलिबागकरांची माफी मागायला लावणारच!’ अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

(MNS Leader Amey Khopkar warns Aditya Narayan over his controversial statement over alibaug)

हेही वाचा :

रणवीर सिंहच्या ताफ्यात आणखी एक ‘शानदार’ गाडी, जाणून घ्या या कारची किंमत आणि फीचर्स   

बॉलिवूडच्या ‘या’ चॉकलेट हिरोसोबत रोमान्स करायचाय, समांथाचे बिनधास्त बोल!

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.