Happy Birthday Mohammed Rafi | यशाच्या शिखरावर असताना ‘सुरांच्या बादशाह’ने घेतला होता क्षेत्र सोडण्याचा निर्णय, मग असे झाले की…..

रफींच्या आवाजात एक अनामिक जादू होती, जी थेट रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. कदाचित यामुळेच आजही त्यांची गाणी लोकांच्या हृदयात आहेत.

Happy Birthday Mohammed Rafi | यशाच्या शिखरावर असताना ‘सुरांच्या बादशाह’ने घेतला होता क्षेत्र सोडण्याचा निर्णय, मग असे झाले की.....
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 10:51 AM

मुंबई : आज भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी झाला होता. रफींच्या आवाजात एक अनामिक जादू होती, जी थेट रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. कदाचित यामुळेच आजही त्यांची गाणी लोकांच्या हृदयात आहेत. असे म्हणतात की, रफींच्या आवाजाची जादू जितकी मोठी होती, तितकेच त्यांचे व्यक्तिमत्त्व देखील मोठे होते. लोकांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढे असत. म्हणूनच, लोकांच्या आणि रसिकांच्या हृदयात त्यांचे एक विशेष स्थान आहे (Mohammed Rafi Birthday Special Story).

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित ठावूक नसतील…

गायकी सोडण्याचा निर्णय

मोहम्मद रफी जेव्हा गायकीच्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान झाले होते, नेमक्या त्याचवेळी त्यांनी गाणे सोडण्याचे ठरवले होते. या मागचे कारण होते मौलवी. मौलवींच्या सांगण्यावरूनच त्यांनी चित्रपटात गाणे बंद केले. असे म्हटले जाते की, जेव्हा रफी साहेब हज यात्रेहून परत आले, तेव्हा काही लोकांनी त्यांना सांगितले की, आता तुम्ही हाजी झाला आहात, म्हणून तुम्ही गाणे वाजवणे हे सगळे थांबवा. त्यांच्या या सल्ल्यानंतर रफींनी गाणे सोडले.

रफींनी गायकी सोडली ही गोष्ट सर्वत्र पसरताच सर्वजण अस्वस्थ झाले. रफींच्या कुटुंबाने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी गाणे सोडले तर घर चालणार नाही, हे त्यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. बर्‍याच लोकांनी पटवून दिल्यानंतर, रफी यांची खात्री झाली आणि त्यांनी पुन्हा गाणे सुरू केले (Mohammed Rafi Birthday Special Story).

पंजाबी चित्रपटातून पहिला ब्रेक

‘गुलबलोच’ या पंजाबी चित्रपटातून रफी यांना करिअरचा पहिला ब्रेक मिळाला होता. ‘गांव की गोरी’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. 1956 ते 1965 हा काळ रफी यांच्या कारकीर्दीचा सर्वात चांगला काळ होता. या कालावधीमध्ये त्यांनी एकूण 6 फिल्मफेअर जिंकले.

सुरांच्या दुनियेचा बादशाह

लोक त्यांच्या आवाजाचे इतके वेडे होते, की मृत्यूच्या दिवशी देखील एका व्यक्तीने शेवटच्या इच्छेत त्यांचे नाव घेतले. बीबीसीच्या वृत्तानुसार, एकदा गुन्हेगाराला फाशी दिली जात होती. जेव्हा त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली, तेव्हा त्याने कुणालाही भेटण्याची इच्छा व्यक्त केली नाही किंवा काही खाल्ले नाही. त्याऐवजी, त्याने जे मागितले ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

त्या व्यक्तीची शेवटची इच्छा होती की, रफीच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटाचे गाणे ‘ऐ दुनिया के रखवाले’ मरण्यापूर्वी ऐकायचे आहे. त्यानंतर एक टेप रेकॉर्डर आणून हे गाणे वाजवले गेले. असे म्हणतात की, रफी साहेबांनी तब्बल 15 दिवस या गाण्यासाठी रियाझ केला होता. रियाझ करता करता त्यांचा आवाज रेकॉर्डिंगनंतर इतका खराब झाला होता की, कदाचित ते आपला आवाज परत मिळवू शकणार नाहीत, असेही म्हटले जात होते.

(Mohammed Rafi Birthday Special Story)

हेही वाचा : 

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.