गोविंदापेक्षा माकडाला अधिक भाव, राहण्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेल; चंकी पांडेने सांगितला मजेदार किस्सा
आंखें हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये गोविंदा, चंकी पांडे आणि शक्ती कपूर या तिघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाबद्दल यातील कलाकारांनी एक खुलासा केला आहे.
बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. डेविड धवन यांचा आंखे चित्रपट तर खूपच गाजला. हा चित्रपट त्यावेळी जबरदस्त सुपरहिट झाला होता. या चित्रपटामध्ये त्या दोघांसोबत एका माकडाचीही महत्वाची भूमिका साकारली होती. त्या संदर्भात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. गोविंदा आणि चंकी पांडे पेक्षा या माकडाला या चित्रपटात काम करण्यासाठी जास्त फी मिळाली होती.
गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांनी आंखें चित्रपटात काम केले होते आणि अनेक वर्षानंतर हे तिघेही पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शो मध्ये एकत्र दिसले. यादरम्यान तिघांनी आंखें चित्रपटाच्या शूटिंगचे संबंधित अनोखे किस्से शेअर केले. या चित्रपटामध्ये माकडाची भूमिका महत्त्वाची होती. माकडाला त्या लोकांपेक्षाही जास्त पैसे देखील मिळाले होते असे चंकी यांनी नमूद केलं.
शक्ती कपूर म्हणाले आम्ही हा चित्रपट एकत्र केला होता ज्यात हे दोघे नायक होते. खरंतर नाही तीन नायक होते, गोविंदा, चंकी आणि एक माकड त्यांना विचारा. यानंतर चंकी पांडे म्हणाले की, हो या चित्रपटासाठी माकडाला जास्त पैसे मिळाले होते.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खास रूम
गोविंदा म्हणाला आम्हाला पैसे मिळाले नाही. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये माकडायला खोली देण्यात आल्याचे शक्तीने सांगितले. जेव्हा डेव्हिड माकडाला बोलवायचा तेव्हा चंकी यायचा आणि जेव्हा तो चंकीला हाक मारायचा तेव्हा माकड यायचा.
चंकी पांडेने केला खुलासा
मीडियाशी संवाद साधताना चंकी पांडे म्हणाले त्या माकडाला माझ्या आणि गोविंदा पेक्षा जास्त पगार दिला जात होता. तो दक्षिणेतील खूप महागडा माकड होता आणि तो माकड सहा असिस्टंट सोबत काम करायचा आणि तो एक मोठा स्टार होता जो हॉटेल सन एंड सैंड मध्ये थांबला होता. याच्यामुळे सेटवर अनेक विचित्र गोष्टी घडायच्या पण सगळ्यांचेच त्याच्यावर प्रेम होते. आंखें चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो सुपरहिट ठरला होता आणि या चित्रपटाने मोठी कमाई देखील केली होती.