New Song : ‘मोरे पिया’, देवदत्त बाजी यांचं नवं गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला
देवदत्त बाजी नव्या धाटणीचं गाणं घेऊन लवकरच आपल्या समोर येतोय. 'मोरे पिया' हे या गाण्याचे बोल आहे. ('More Piya', Devdatt Baji's new song )
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) चरित्रावर आधारलेल्या ‘फत्तेशिकस्त’ आणि आगामी ‘जंगजौहर’ या सिनेमांचा युवा संगीतकार ‘देवदत्त मनिषा बाजी’ नव्या धाटणीचं गाणं घेऊन लवकरच आपल्या समोर येतोय. ‘मोरे पिया’ हे या गाण्याचे बोल आहे. पाश्चात्य इलेकट्रॉनिका आणि चिलस्टेप लाऊंज प्रकारात त्यानं याची सुरावट गुंफली आहे. (Devdatta Bajji’s new song)
गाण्यात असद खान यांचं सतार वादन
विशेष म्हणजे ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान यांच्या ‘स्लमडॉग मिलियनर’ या ऑस्कर विजेत्या अल्बम मधील ‘मौसम अँड एस्केप’ या गाण्यात आपल्या अप्रतिम सतार वादनानं अवघ्या जगभरात नाव कमावलेले असद खान यांनी देवदत्तच्या ‘मोरे पिया’ या गाण्यामध्ये देखील आपल्या सतार वादनाचं योगदान दिलं आहे.
गाण्याला लाभलाय गायिका आनंदी जोशी यांचा गोड आवाज
महाराष्ट्रीय लोकसंगीतासाठी नावाजलेल्या देवदत्तनं या गाण्यातून पारंपरिक आणि पाश्चात्य प्रकारांचा सुरेख मेळ साधला आहे. या गाण्याला दाक्षिणात्य सिनेमांनाही आपल्या आवाजाने भुरळ घालणारी गायिका आनंदी जोशी हिचा आवाज लाभला आहे. या गाण्याची निर्मिती आणि शब्दरचना देवदत्तची असून ब्रज भाषेतल्या ओळी श्रुती कुलकर्णीनं लिहिल्या आहेत.
देवदत्त यांची प्रतिक्रिया
गाण्याविषयी बोलताना देवदत्त म्हणाला, ‘असद खान आणि आनंदी जोशी यांच्याबरोबर गाणं करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर निरनिराळे जॉनर सादर करण्याचा माझा प्रयत्न या गाण्यामुळे साध्य होत आहे.’
संबंधित बातम्या
श्रीदेवीनंतर फक्त मीच विनोदी भूमिका करते, कंगनाच्या दाव्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!
New Song : यशोमानचा रोमँटिक अंदाज, ‘तू इथे जवळी राहा’ गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला!