Alia Bhatt Announces Pregnancy:आलियाच्या प्रेग्नंसींच्या न्यूज पेक्षा कंडोम कंपनीच्या ट्विटचीच जास्त चर्चा; यांच्या क्रिएटीव्हीटीला तोड नाही

| Updated on: Jun 27, 2022 | 7:34 PM

इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत आलिया-रणबीरने आई-बाबा होणार असल्याची गूड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली. आलियाने स्वतःचा आणि रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला. आलियाच्या या फोटोमध्ये ती बेडवर पडून अल्ट्रासाऊंड मशीनच्या स्क्रीनकडे पाहत असल्याचे दिसत आहे. Our baby! Coming Soon असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केलाय.

Alia Bhatt Announces Pregnancy:आलियाच्या प्रेग्नंसींच्या न्यूज पेक्षा कंडोम कंपनीच्या ट्विटचीच जास्त चर्चा; यांच्या क्रिएटीव्हीटीला तोड नाही
Follow us on

कपूर कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आलिया भट्टने(Alia Bhatt announces pregnancy) तिच्या गरोदरपणाची गोड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. आलियाने अल्ट्रासाऊंड अपॉइंटमेंट घेत असतानाचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. Our baby! Coming Soon असं कॅप्शन आलियाने या फोटाला दिले आहे. मात्र, आलियाच्या प्रेग्नंसींच्या न्यूज पेक्षा कंडोम कंपनीच्या ट्विटचीच जास्त चर्चा होत आहे. ड्युरेक्स कंडोम कंपनीने(Durex condom) अतिशय क्रिएटीव्ह पद्धतीने आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच आलियाच्या प्रेग्नेंसीची खुशखबर आली आहे. आलिया आणि रणबीर कपूरचे लग्न 14 एप्रिलला वांद्रे येथील आरके हाऊसमध्ये झाले. या लग्नात फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत आलिया-रणबीरने आई-बाबा होणार असल्याची गूड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली. आलियाने स्वतःचा आणि रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला. आलियाच्या या फोटोमध्ये ती बेडवर पडून अल्ट्रासाऊंड मशीनच्या स्क्रीनकडे पाहत असल्याचे दिसत आहे. Our baby! Coming Soon असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केलाय. या फोटोसह तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सिंहांचे एक कुटुंब दिसत आहे. ज्यामध्ये एक सिंहीणी सिंहाला प्रेमाने मिठी मारत आहे, एक शावक त्यांना पाहत आहे.

यानंतर सोशल मीडियावरही आलिया आणि रणबीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच कंडोम ब्रँड ड्युरेक्स कंपनीने अत्यतं हटके आणि क्रिएटीव्ह पद्धतीने यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मेहफिल में तेरी, हम तो क्लिअरली नहीं थे असं ट्विट ड्युरेक्सने केले आहे. ड्युरेक्सच्या या पोस्टवर केमेंट्सचा वर्षाव होत आहे.