Mother’s Day 2022 : वय कमी पण आईच्या रोलची हमी! बॉलिवूडचा नादच खुळा, वाचा मदर्स डे स्पेशल स्टोरी…

बॉलिवूड आणि आईची भूमिका यांची केमिस्ट्री तशी विचित्र आहे. कारण काही वेळेता मुलापेक्षा आईच वय हे खऱ्या आयु्ष्यात कमी आहे. पण तरिही ऑन स्क्रीन आई ही मुलाला अगदी शोभून दिसली.

Mother's Day 2022 : वय कमी पण आईच्या रोलची हमी! बॉलिवूडचा नादच खुळा, वाचा मदर्स डे स्पेशल स्टोरी...
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 12:58 PM

मुंबई : बॉलिवूड सिनेमांमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची असते. दहापैकी नऊ कथानकांमध्ये आई हे कॅरेक्टर असतच असतं! बहुतांश सिनेमे आईच्या रोलशिवाय अपूर्णच असतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आईचं कॅरेक्टर करणाऱ्या अभिनेत्रींना (Bollywood Actress) एक वेगळं स्थान आहे. मदर्स डे निमित्त अशा अभिनेत्रीबाबतच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बॉलिवूड आणि आईची भूमिका यांची केमिस्ट्री तशी विचित्र आहे. कारण काही वेळेता मुलापेक्षा आईच वय हे खऱ्या आयु्ष्यात कमी आहे. पण तरिही ऑन स्क्रीन आई ही मुलाला अगदी शोभून दिसली. तर दुसरीकडे ऑफ स्क्रीन ज्यांच्यासोबत रोमान्स केला, त्यासोबत आई आणि मुलाचं नातं ऑन स्क्रीन रंगवण्याचे किस्से बॉलिवूडमध्ये आहेत. बॉलिवूडची आई म्हटली की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात राखी, रीमा लागू, निरुपा रॉ यांचे चेहरे. आईच्या अनेद भूमिका साकारलेल्या या अभिनेत्री बॉलिवूडसाठी आईपणाची एक ओळख देणाऱ्याच होत्या. अशाच काही इंटरेस्टिंग आईच्या (Mothers Day 2022) भूमिका साकारणाऱ्या काही अभिनेत्री आणि त्यांच्या रंजक किस्स्यांविषयी जाणून घेऊयात…

नरगिस – मदर इंडिया

साल 1957चं. मदर इंडिया सिनेमात नरगिसने आईची भूमिका साकारली. आपल्या करीअरच्या पीकमध्ये असताना नरगिस सुनील दत्त आणि राजकुमार यांच्या आईची भूमिका केली. यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नरगिसपेक्षा सुनिल दत्त हे पाच दिवसांनी मोठे होते, तर राज कुमार हे तब्बल 3 वर्ष मोठे होते. महत्त्वाचं म्हणजे मदर इंडियानंतर 1964 साली यादे सिनेमात नरगीस आणि सुनील दत्त एकमेकांचे नवरा-बायको म्हणून पाहायला मिळाले होते. त्याआधीच 1958 सालीच दोघांनीही लग्न केलं होतं.

राखी – शक्ती सिनेमा

राखीनं 1982 साली अमिताभ बच्चनच्या आईचा रोल केला होता. आता राखी आणि अमिताभ यांच्या तब्बल 5 वर्षांचं अंतर आहे. राखी अमिताभ बच्चनपेक्षा पाच वर्षांनी लहान होती. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आईच्या भूमिकेत असलेल्या राखीनं आणि अमिताभ बच्चन यांची कपन केमिस्ट्रीही चाहत्यांनी अनुभवली होती. बेमिसाल, कभी कभी आणि बरसात या सिनेमात त्यांनी एकमेकांचे पार्टनर म्हणून भूमिका वढवल्यात.

वहीदा रहमान – त्रिशूल

1978 साली त्रिशून सिनेमाल आला. या सिनेमा अमिताभ बच्चनच्या आईच्या रोलमध्ये वहीदा रहमान होती. पण दोन वर्ष अगोदरच वहीदा रहमान आणि अमिताभ बच्चन हे कपल म्हणून सिनेमात रोमान्स करताना बॉलिवूडमध्ये बघायला मिळाले होते.

अर्चना जोईस – केजीएफ

केजीएफ सिनेमा सध्या गाजतोय. पण या सिनेमात रॉकी भाईच्या आईची भूमिका करणारा अर्चना ही रॉकीपेक्षा तब्बल 9 वर्षांना लहान आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 27 वर्षांची अर्चना 36 वर्षांच्या यशची आई दाखवली आहे. पण सिनेमात मात्र या दोघांच्या वयाचा अंदाज बांधण निव्वळ अशक्य आहे.

बाहुबली – अनुष्का शेट्टी

2015 साली आलेल्या बाहुबली सिनेमात अनुष्का शेट्टीनं देवसेना या एका खास भूमिकेतून प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं. ही देवसेना बाहुबली पेक्षा दोन वर्षांनी लहान होती. अर्थात प्रभासची आई बनलेल्या देवसेनेचं म्हणजेच अनुष्का शेट्टीचं वय 36 वर्ष तर प्रभासचं वय हे 38 वर्ष होते.

सोनाली कुलकर्णी – भारत

आपली मराठमोळी सोनाली कुलकर्णी चक्क सलमान खानही आई दाखवली होती. सिनेमाचं नाव होतं भारत. भारत सिनेमात जेव्हा सोनाली कुलकर्णीनं सलमान खानच्या आईची भूमिका वठवली, तेव्हा सोनली कुलकर्णीचं वय 44 वर्ष होतं, तर सलमान खान तेव्हा 53 वर्षांचा होता. दोघांमध्ये तब्बल 9 वर्षांचं अंतर होतं.

रिमा लागू – वास्तव

रिमा लागूने बॉलिवूडमध्ये अनेकदा आईची भूमिका साकारली. पण वास्तवमध्ये जेव्हा रिमा लागू यांनी आईचा रोल केला, तेव्हा तो अधिकच खास ठरला. कारण आपल्या पेक्षा एका वर्षानं मोठ्या असलेल्या संजय दत्तची भूमिका रिमा लागू यांनी यावेळी साकरली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.