श्रीलंकेतील गृहयुद्ध ते महान क्रिकेटर; मुरलीधरनचा बायोपिक ‘800’ चं मोशन पोस्टर पाहिलंत का?

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतूपती या चित्रपटात मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे.

श्रीलंकेतील गृहयुद्ध ते महान क्रिकेटर; मुरलीधरनचा बायोपिक '800' चं मोशन पोस्टर पाहिलंत का?
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 4:15 PM

दुबई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muthiah Muralidaran) याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतूपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकची चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब झाले. (Motion poster Muralidaran Biopic Titled 800 released Stars Vijay Sethupathi)

‘800’ असे मुरलीधरनच्या बायोपिकचे नाव असून 13 ऑक्टोबर रोजी आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबादमधील सामन्यापूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. या मोशन पोस्टरमध्ये मुरलीधरनचे आयुष्य अॅनिमेशन रुपात थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोशन पोस्टरवरुन स्पष्ट होत आहे की, श्रीलंकेतील गृह युद्धापासून ते मुरलीधरन क्रिकेटर बनेपर्यंतचा प्रवास आणि त्याच्या गोलंदाजीवर उपस्थित केलेले प्रश्न या सर्वांवर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांनी अभिनेता विजय सेतूपतीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटवर मुरलीधरन आणि विजय सेतूपती या दोघांचेही चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. या बायोपिकची निर्मिती तमिळ भाषेत होणार असून, जगभरातील इतरही अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. (Vijay Sethupathi’s Muthiah Muralidaran biopic announced)

दक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती याचा चाहता वर्ग मोठा असून, या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळ्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना महामारी काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना, या बातमीने दक्षिणेत त्यातही विजयच्या चाहत्यांमध्ये मात्र काहीसे आनंदाचे वातावरण तयार केले आहे.

मुथय्या मुरलीधरनचे भारताशी खास नाते

श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला (Muthiah Muralidaran) ‘विकेट्सचा बादशाह’ म्हणून ओळखले जाते. 1992 मध्ये त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली होती. तब्बल 19 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात त्याच्या नावाची चर्चा होती. जुलै 2010 मध्ये त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने शेवटचा सामानादेखील भारताविरुद्ध खेळला होता. शेवटच्या सामन्यात प्रग्यान ओझाची विकेट घेत, त्याने आपल्या 800 विकेट्स पूर्ण केल्या.

श्रीलंकेचा हा फिरकीपटू भारताचा जावईसुद्धा आहे. मुथय्या मुरलीधरनने 2005 मध्ये चेन्नईच्या माधीमलार राममूर्ती हिच्याशी विवाह केला होता. सध्या मुथय्या मुरलीधरन आयपीलच्या सनरायझर्स हैद्राबाद टीमच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहे.

मुरलीधरनची क्रिकेट कारकीर्द

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळी मिळवण्याचा रेकॉर्ड मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीने 133 कसोटी सामन्यांमधील 230 डावांमध्ये तब्बल 800 बळी मिळवले आहेत. यात त्याने 1 हजार 794 निर्धाव षटकं टाकली आहेत. 51 धावा देत 9 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. तब्बल 67 वेळा त्याने 5 पेक्षा अधिक बळी मिळवण्याची किमया केली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 350 सामन्यांमध्ये 534 बळी मिळवले आहेत. 30 धावा देत 7 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी होती. आयपीएलमध्ये त्याने 66 सामन्यांमध्ये 63 बळी मिळवले आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2020 | प्लेऑफमध्ये ‘हे’ तीन संघ पोहचणार, अजित आगरकरची भविष्यवाणी

Gautam Gambhir Birthday | तू होतास म्हणून…, गंभीरच्या वाढदिनी चाहत्यांकडून 2011 च्या वर्ल्डकपची आठवण

“मुंबईच्या ‘या’ विध्वंसक फलंदाजाची दोन महिन्यात टीम इंडियात निवड होणार”

IPL 2020 mid-season transfer | ‘या’ नियमानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल करता येणार

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश

IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार

(Motion poster Muralidaran Biopic Titled 800 released Stars Vijay Sethupathi)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.