मुंबई : प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरीज (Movie and web series) प्रदर्शित केल्या जातात. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटगृहांऐवजी अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्यात मोठी टक्कर होणार आहे. भूमीचा आगामी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना, कियारा अडवाणी आपला चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा धोका पत्करत आहे. या आठवड्यात ओटीटी आणि चित्रपटगृहात मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे. या आठवड्यात ‘हे’ नवे चित्रपट आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत (Movie and web series release on ott platform and theatre in this week).
अभिनेता कुशल टंडनची वेब सीरीज ‘बेबाकी’ सीझन 1चा दुसरा भाग या आठवड्यात अल्ट बालाजीवर प्रदर्शित होणार आहे. प्रेम, आकर्षण आणि वेडेपणाची ही कहाणी 11 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजमध्ये कुशालसह करण जोतवाणी, शिवज्योती राजपूत आणि सुचित्रा पिल्लई महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
इंटेलिजेंसच्या एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असणाऱ्या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांची कहाणी सोनी लिवने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. हे अधिकारी एकत्र येऊन आपल्या देशाला दहशतवाद्यांपासून वाचवतात, अशी या वेबसीरीजची कथा आहे. या मालिकेत युधिष्ठिर सिंह, पूजा गौर, गश्मीर महाजनी आणि अश्मिता जग्गी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘श्रीकांत बशीर’ ही वेब सीरीज 11 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा ‘दुर्गामती’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पूर्णपणे वेगळी दिसणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे. ‘दुर्गामती’ हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे (Movie and web series release on ott platform and theatre in this week).
‘लंडन कॉन्फिडेंशियल’च्या यशानंतर, ‘झी 5’ने आपली ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ ही थ्रिलर वेब सीरीज जाहीर केली आहे. ही वेब सीरीज 11 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत ऋचा चड्ढा, करिश्मा तन्ना आणि अरुणोदय सिंह महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले आहे.
संजय दत्तचा ‘टोरबाज’ हा नवीन चित्रपट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा एका माणसाविषयी आहे ज्याने आपल्या मुलांना दहशतवादी कारवायांमध्ये हरवले आणि आता तो शरणार्थी शिबिरातील मुलांना चांगले जीवन देऊ इच्छित आहे. हा चित्रपट 11 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट या आठवड्यात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता आदित्य सील कियारा सोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार. आहे या चित्रपटात इंदू नावाची एक मुलगी लग्न करण्यासाठी एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे. तिला एका स्टायलिश मुलाला डेट करायची इच्छा आहे. आणि त्यासाठी ती डेटिंग अॅपचा वापरही करते. हा चित्रपट 11 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. कियाराच्या या चित्रपटाला किती प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन बघणार, याकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लगून राहिले आहे.
(Movie and web series release on ott platform and theatre in this week)
Delhi Crime 2 | चाहत्यांसाठी खुशखबर… दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच येणार!https://t.co/MT9z4xyOts #Webseries #DelhiCrime #secondpart @RajeshTelang
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020