MOVIE REVIEW : भाबड्या स्वप्नांचा गोड पाठलाग ‘खारी बिस्कीट’

खारी-बिस्कीट'मध्ये संजय जाधवनं काय वेगळी करामत केली आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. पण संजय जाधवनं दोन निरागस मुलांचा भाबड्या स्वप्नांचा पाठलाग अप्रतिम (khari biscuit movie review) फुलवला आहे.

MOVIE REVIEW : भाबड्या स्वप्नांचा गोड पाठलाग 'खारी बिस्कीट'
Follow us
| Updated on: Nov 01, 2019 | 8:05 PM

मुंबई : लहान मुलांचं भावविश्व अधोरेखित करणारे अनेक चित्रपट आतापर्यंत आले आहेत. प्रत्येक सिनेमात वेगवेगळे कंगोरे मांडण्याचा प्रयत्न निर्माता दिग्दर्शकांनी केला (khari biscuit movie review) आहे. संजय जाधवचे दिग्दर्शक म्हणून आतापर्यंतचे चित्रपट बघितले तर कलरफुल, अॅक्शन, ड्रामा, लव्हस्टोरी अशाच पठडीतले. त्यामुळे ‘खारी-बिस्कीट’मध्ये संजय जाधवनं काय वेगळी करामत केली आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. पण संजय जाधवनं दोन निरागस मुलांचा भाबड्या स्वप्नांचा पाठलाग अप्रतिम फुलवला आहे. सिनेमात काही गोष्टी खटकतात, काही कल्पनाशक्तीचं हसू येतं पण तरीही ही खारी-बिस्कीट हवीहवीशी (khari biscuit movie review) वाटतात.

ही गोष्ट आहे खारी (वेदश्री खाडिलकर) आणि बिस्किट (अथर्व कदम)ची. सिनेमाचं कथानक 2011च्या पार्श्वभूमीवर सुरु होतं. खारी हे जग जरी डोळ्यांनी बघू शकली नसली तरी तिची स्वप्नं मात्र मोठी असतात. खारीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिस्किटची काहीही करण्याची तयारी असते. गुण्या गोविंदानं हसत खेळत सगळं सुरळीत सुरु असताना खारी बिस्कीटसमोर एक अजब अट ठेवते. भारतात सुरु असणाऱ्या वर्ल्डकपचा थरार खारीला अनुभवायचा असतो. त्यामुळे ती बिस्किटसमोर वर्ल्डकप मॅच स्टेडिअममध्ये जाऊन बघण्याचा हट्ट धरते आणि मग सुरु होतो भाबड्या स्वप्नांचा गोड तितकाच हृदयस्पर्शी पाठलाग… आपल्या बहिणीला स्टेडिअममध्ये जाऊन मॅच दाखवायचीच असा चंग बिस्किट बांधतो. आता खारीला बिस्किट स्टेडिअममध्ये नेऊन मॅच दाखवतो का? त्यासाठी त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? कोणकोण त्याला या सगळ्यात मदत करतं? हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला ‘खारी-बिस्कीट’ बघावा लागेल.

सिनेमाची संकल्पना उत्तम आहे. एक वेगळा प्रयत्न संजय जाधवनं या सिनेमात केलाय. फक्त एकच राहून राहून वाटतं की ही संकल्पना जर अजून उत्तमरित्या फुलवली असती तर या सिनेमानं थेट काळजात हात घातला असता. असो. सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या गोष्टीचा जेवढा आत्मा आहे तेवढीच ती दाखवली आहे. गोष्ट उगाच न ताणता ती आटोपशीर घेतल्यामुळे गोष्टीचा कुरकुरीतपणा टिकून राहिला आहे. सिनेमात काही प्रसंग अनाकलनीय वाटतात. पण तुम्ही दोन्ही पोरांच्या प्रेमातच इतकं पडाल की इतर गोष्टींकडे आपोआपच तुमचा कोनाडोळा होईल. 2011 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शेवटचा वर्ल्ड कप खेळला (khari biscuit movie review) होता.

विशेष म्हणजे तो वर्ल्ड कपही भारतात झाला होता. त्यामुळे तेव्हा क्रिकेट फिव्हर काय होतं हे वेगळं सांगायला नको. पण सिनेमात हा क्रिकेट फिव्हर हवा तसा दिसत नाही. बऱ्याचशा गोष्टी वरवरच्या वाटतात. क्रिकेट हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे थिएटरमधला माहोल दिग्दर्शकाला बदलता आला असता. भावा-बहिणीचं अतूट नातं, बहिणीसाठी कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची जिद्द बाळगणारा भाऊ सोबतीला क्रिकेटचा महासंग्राम असं सगळं खमंग, चमचमीत आपल्यासमोर असताना कुठेतरी या पदार्थाची चव थोडी फिकी वाटते. बरं सिनेमात काही घटना इतक्या पटापट घडतात की एवढसं चिमुरडं पोरगं आपल्या मित्रांसोबत एवढं सगळं पटापट कस काय मिळवतोय हे मनाला न पटणारं आहे.

दिग्दर्शक म्हणून संजय जाधव यांनी आतापर्यंत फुल टू धमाल, कलरफुल सिनेमे केले आहेत. पहिल्यांदाच आपल्या कम्फर्ट झोन, आपले लाडके कलाकार यातून बाहेर पडत त्यांनी वेगळ्या विश्वात नेण्याचा प्रयत्न केला आहे. जर संजय जाधव यांनी त्यांची पाटी कोरी ठेऊन जर हा सिनेमा बनवला असता तर तो अधिक फुलला असता, असं मला (khari biscuit movie review) वाटतं.

दोन्ही मुलांनी सिनेमात काम उत्तम केली आहेत. विशेषत: खारीच्या भूमिकेतील वेदश्री निव्वळ अप्रतिम. तिचा निरागसपणा फक्त बघत बसावासा वाटतो. बिस्कीटच्या भूमिकेतील अथर्वही भन्नाट. वेदश्री आणि अथर्वची सिनेमातील केमिस्ट्री भन्नाट. सोबतीला सुशांत शेलार, संजय नार्वेकर, संजीवनी जाधव, नंदिता पाटकर यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. सिनेमातलं सूरज-धीरज, अमितराजचं संगीत छान जमलं आहे. विशेषत: कुणाल गांजावालानं गायलेलं सिनेमाचं टायटल साँग उत्तम जमून आलं आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे. सिनेमा तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहे. पण सिनेमाच्या कथा-पटकथेवर अजून मेहनत घेतली असती तर बरं झालं (khari biscuit movie review) असतं.

एकूणच काय तर सिनेमात काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी जर का टाळल्या असत्या तर हा सिनेमा थेट काळजाला भिडला असता. पण तरीही दोन निरागस चिमुरड्यांची भाबड्या स्वप्नांचा पाठलाग करतानाची ही गोड गोष्ट एकदा बघावी अशीच आहे.

टीव्ही 9 मराठीकडून या सिनेमाला तीन स्टार्स

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.