Me Vasantrao Review : गाण्याच्या मैफलीतून उडलगडणार वसंतराव देशपांडेंचा जीवनपट, सच्च्या कलावंताचं सुरेल जीवनगाणं….

Me Vasanrao Review : नवा कोरा सांगितिक मेजवानी असणारा 'मी वसंतराव' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कसा आहे? चला जाणून घेऊयात...

Me Vasantrao Review :  गाण्याच्या मैफलीतून उडलगडणार वसंतराव देशपांडेंचा जीवनपट, सच्च्या कलावंताचं सुरेल जीवनगाणं....
मी वसंतराव- चित्रपटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 1:15 PM

मुंबई : संगीत(Music) हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतात एकाहून एक सरस गायक होऊन गेले. त्यातच महाष्ट्राने अभिमानाने आपल्या शिरपेचात रोवून घ्यावं आणि दिमाखात मिरवावं, अशी गायकी असणारं नाव म्हणजे पं. वसंतराव देशपांडे (Vasnatrao Deshpande). ज्यांच्या गायकीने रसिकांना काही वेगळं ऐकण्याची दृष्टी दिली, त्या वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao) हा सिनेमा आलाय. हा सिनेमा नेमका कसा आहे? तो पाहावा का? पाहावा तर का पाहावा? सिनेमाचं कथानक, सिनेमाची वैशिष्ट्ये, कलाकारांची कामं, गाणी-संगीत, सिनेमाचं रेटिंग आणि बरंच काही जाणून घेऊयात…

सकाळी उठून गाणं ऐकलं की मुड फ्रेश होतो. त्यातही जर शास्त्रिय संगीत असेल आपल्याला आतून शांत व्हायला होतं. तसंच हा सिनेमा पाहिल्यानंतर तुमचं मन अगदी शांत होतं. या सिनेमात गाणं कसं असावं, याविषयी दीनानाथ मंगेशकर वसंतरावांना समजावतात. ते म्हणतात. “असं गावं की लोकांनी शब्दच विसरावेत. स्वत:चा आवाज विसरावा. विचार करणंच विसरावं…” हा सिनेमा पाहिल्यावर तुम्हीही असेच नि:शब्द होता… त्यामुळे संगीत-गाण्याचे तुम्ही चाहते असाल तर हा सिनेमा तुम्ही बघायलाच हवा…

कथानक

‘मी वसंतराव’ सिनेमाच्या नावातच सारं काही आहे. ख्यातनाम गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. वसंतराव यांचं बालपण ते ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकापर्यंतचा त्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. एकेरी पालकत्व वगैरे शब्द आजही आपल्याला बोजड वाटतात. पण वसंतरावांच्या आईने त्या काळात ते सारं हिमतीने पेललं. जे अनिता दातेने पडद्यावर नेमक्या हावभावासह मांडलंय. वसंतराव देशपांडे यांचं जीवन चढउतारांनी भरलेलं आहे. संसार, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळताना गाण्याची आवड जपताना होणारी फरपट या सिनेमाच्या माध्यामातून दाखवण्यात आली आहे. या सगळ्यात वेळोवेळी मिळालेल्या चांगल्या गुरुंमुळे वसंतरावांचं आयुष्य कसं प्रवाही होतं, हे सांगणारी ही कथा आहे.

सिनेमातील पात्र

हा सिनेमा निपुण अविनाश धर्माधिकारी याने दिग्दर्शित केलाय. चित्रपटाची कथा कितीही चांगली असेल, दिग्दर्शकानेही कितीही मेहनत घेतली, तरी सिनेमातील कलाकार जोवर ती उत्तमरित्या साकारत नाहीत तोवर सिनेमा पडद्यावर बघताना मनाला भिडत नाही. या सिनेमातील कलाकारांच्या निवडीपासूनच त्याची चुणूक दिसते. वसंतराव देशपांडे यांच्या भूमिकेत त्यांचा नातू अर्थात गायक राहुल देशपांडे पाहायला मिळतात. गायकीमागे दडलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयातून वसंतराव प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभे केलेत. त्यांच्या अभिनयामुळे सिनेमात जान आलीय असं म्हणता येईल. वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत अनिता दाते आपल्याला पाहायला मिळते. तिच्या अभिनयाला तर तोडच नाही… ज्या प्रकारे तिने ताईंचं( राधा) पात्र साकारलंय ते तुम्हाला वेळोवेळी थक्क करतं. पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर पाहायला मिळतो. त्याच्या दिसण्यापासून त्याच्या वागण्यात तुम्हाला केवळ भाईच दिसत राहतात. पु. ल. सारखाच पुष्कराजही त्याचा अभिनय तुम्हाला हसवत राहातो. अमेय वाघने साकारलेले दीनानाथ मंगेशकर तुम्हाला चांगल्या सुरांसोबतच वास्तवाची जाणही देऊन जातात. कलाकारांची आणि दिग्दर्शकाची मेहनत तुम्हाला मोठ्या पडद्यावर ठसठशीतपणे उठून दिसते.

सिनेमा का पाहावा?

कोणताही सिनेमा पाहण्याची काही प्रमुख कारणं असतात. हा सिनेमा का पाहावा? त्याची काही कारणं-

1. सुरेल गाण्यासाठी- बऱ्याचदा सिनेमा रंजक करण्यासाठी त्यात ओढून ताणून गाणी घुसवली जातात. पण या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे गाण्यातून सिनेमा सांगितलाय, असं प्रेक्षकांना पदोपदी वाटत राहातं. या सिनेमात एकूण 22 गाणी आहेत. त्यामुळे तुमचे तीन तास अगदी सुरेल होऊन जातात.

2. राहुल देशपांडेची लावणी ऐकण्यासाठी- या सिनेमाच्या माध्यमातून राहुल देशपांडे बरेच नवे प्रयोग करत आहेत. गाणं त्यांच्यासाठी नवीन नसलं तरी त्यांनी लावणी गाणं सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं आहे. त्यामुळे सिनेमातील इतर गाण्यांसोबतच ‘पुनव रातीचा, लखलखता केला मी शिणगार…’ ही लावणी ऐकण्यासाठी आणि याच लावणीवरचा राहुल देशपांडेंचा अभिनय पाण्यासाठी तुम्ही नक्कीच थिएटर गाठलं पाहिजे…

3. निसर्गाची सफर करण्यासाठी- सिनेमाच्या सुरूवातीपासूनच निसर्गाचा अद्भूत नजारा तुमच्या डोळ्यांना सुखावतो. एका खुर्चीत बसून निसर्गरम्य ठिकाणांची सफर करावीशी वाटत असेल तर हा सिनेमा बघायलाच हवा. यात अगदी ग्रामिण भागातील माळापासून ते उत्तर भारतातील बर्फाळ प्रदेश पाहायला मिळतो.

4. महाराष्ट्राच्या समाज मनात डोकावण्यासाठी- तुम्ही म्हणाल सिनेमा आहे गायकीचा मग समाज मनमध्येच कुठून आलं? तर या सिनेमात वसंतरावांच्या वाट्याला जे येतं ते त्यांच्या अंगी कला नसल्याने नाही तर समाजातील मानवी प्रवृत्तीमुळे. त्यामुळे या सिनेमातून काय घ्यायचं असा जर सवाल आला तर सच्च्या कलाकाराला खुलेपणानं आणि भरभरून दाद द्यायचा मोठेपणा, असं त्याचं उत्तर असावं…

रेटिंग- सिनेमाचा रिव्हू म्हटलं की रेटिंग ओघानं आलाच… त्यामुळे आम्ही या सिनेमाला देतोय, 4 स्टार्स….

बाकी चित्रपटगृहातून तुम्ही बाहेर पडला की तुमच्या ओठांवर ‘राम राम’ हे गाणं आपसूक रेंगाळत राहातं, हेच या सिनेमाचं यश किंवा मिळकत म्हणता येईल.

संबंधित बातम्या

Me Vasantrao : ‘मी वसंतराव’च्या निमित्ताने उलगडणार भाई आणि वसंतरावांची मैत्री, सच्च्या मैत्रीचे अस्सल किस्से

‘मी वसंतराव’चं संगीत श्रोत्यांच्या भेटीला, शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला संगीत सोहळा

पंडित वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट उलगडणार, ‘मी वसंतराव’ची पहिली झलक

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.