Radhe Quick Review | सलमान खानचा ‘अॅक्शन पॅक’ धमाका ‘राधे’, प्रेक्षकांसाठी ठरेल मनोरंजनाची मेजवानी!

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. ‘भाईजान’चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) रिलीज झाला आहे.

Radhe Quick Review | सलमान खानचा ‘अॅक्शन पॅक’ धमाका ‘राधे’, प्रेक्षकांसाठी ठरेल मनोरंजनाची मेजवानी!
राधे
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 12:14 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. ‘भाईजान’चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) रिलीज झाला आहे. चाहत्यांना त्यांची ‘ईद’ भेट मिळाली आहे. भाईजानने चाहत्यांना केलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. चित्रपटात सलमान खान पोलीस बनून गुंडांना धूळ चारताना दिसत आहे. ‘राधे’मध्ये सलमान खानसह दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. जर, तुम्ही देखील सलमानचा ‘राधे’ बघायचा विचार करत असाल, तर आधी हा क्विक रिव्हू नक्की वाचा (Salman Khan Movie Radhe Quick Review).

चित्रपटाची कथा काय?

‘राधे’ची कहाणी मुंबईत घडत असून, येथील तरुण व्यसनाधीन झाले आहेत. पोलीस ‘राधे’ म्हणजेच सलमान खानला या शहराला नशेतून मुक्त करण्यासाठी बोलवले जाते. ‘राधे’ आपल्या प्रत्येक मिशनला वेगळ्या प्रकारे पूर्ण करणारा म्हणून ओळखला जातो. त्याचे मिशन हे ‘राणा’ (रणदीप हूडा) याच्या विरुद्ध आहे. ज्याला संपूर्ण शहरात ड्रग्जचे व्यसन पसरवायचे आहे.

काय घडतं कथेत?

चित्रपटाची कथा मुंबईवर आधारित असून, यामध्ये सलमान खानच्या अॅक्शनशिवाय दुसरे काहीच दाखवले गेले नाही. राधे हा एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहे, ज्याने गेल्या 10 वर्षात 97 एन्काऊंटर केले आहेत आणि 23 वेळा त्याची बदली झाली आहे. हे शहर ड्रग्ज माफियांपासून वाचवण्यासाठी राधे पुन्हा परतला आहे. गुंडांना ठार मारून धडा शिकवण्याबरोबरच तो आपल्या बॉसची बहीण दीयाच्या (दिशा पाटणी) प्रेमात पडतो. चित्रपटात ही टिपिकल बॉलिवूड स्टाईल लव्हस्टोरी केवळ अ‍ॅक्शनचा समतोल राखण्यासाठी दाखवली गेली आहे. आणखी काही जबरदस्त संवाद या सिनेमातून अपेक्षित होते, पण काहीवेळा ते फार कंटाळवाणे वाटू शकतात. चित्रपटातील अ‍ॅक्शन प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यास प्रभावी ठरली आहे (Salman Khan Movie Radhe Quick Review).

चित्रपटात या सर्व गोष्टी व्यतिरिक्त काही उणीवा आहेत. अ‍ॅक्शन पॅक फिल्ममध्ये ‘हिरोईन’ आहे दिशा पाटणी. जेव्हा जेव्हा दिशा दृश्यात येते, तेव्हा ती खूप ग्लॅमरस दिसते. परंतु, तिचा ट्रॅक चित्रपटाशी काही खास जुळत नाही, वाटते.

कसा आहे चित्रपट?

सलमान खानची अ‍ॅक्शन आणि त्याचे संवाद चाहत्यांची मने जिंकणार आहेत. मात्र, त्याची दिशा पाटणीबरोबरची केमिस्ट्री आणि जॅकी श्रॉफसोबतची मस्ती या गोष्टी रसिकांच्या फारशा पचनी पडणार नाहीत. रणदीप हुड्डाबद्दल बोलायचे, तर तो प्रत्येक वेळी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकतो आहेत. त्याची अ‍ॅक्शन आणि बोलण्याची शैली चाहत्यांना विशेष आवडेल.

ईदच्या निमित्ताने आणि कोरोना साथीच्या या कठीण काळात सलमान खानचा हा चित्रपट लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करू शकतो. सलमानच्या चाहत्यांना आपल्या कुटुंबासमवेत घरी बसून हा चित्रपट पाहणे नक्कीच आवडेल. आपल्याला अ‍ॅक्शन चित्रपट पाहणे आवडत असेल, तर आपण हा चित्रपट नक्कीच पाहू शकता.

(Salman Khan Movie Radhe Quick Review)

हेही वाचा :

Photo : ‘प्‍यार में उम्र नहीं, दिल मायने रखता है’, या अभिनेत्री नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या!

कोरोना काळात एकमेकांना मदत करताना पाहून भावूक झाली रिया चक्रवर्ती, म्हणाली…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.