‘हवा हवाई’ गाताना कविता कृष्णमूर्तींकडून झाली होती चूक, जाणून घ्या या गाण्याचा किस्सा

| Updated on: May 20, 2021 | 9:05 AM

बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी किती महत्त्वाची आहेत, हे आपल्या सर्वांना माहित आहे. केवळ एका गाण्यामुळे देखील चित्रपट सुपरहिट होतो. असे बरेच चित्रपट आहेत, जे चाहते आपल्या गाण्यांमुळे नेहमीच ओळखले जातात.

‘हवा हवाई’ गाताना कविता कृष्णमूर्तींकडून झाली होती चूक, जाणून घ्या या गाण्याचा किस्सा
श्रीदेवी
Follow us on

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी किती महत्त्वाची आहेत, हे आपल्या सर्वांना माहित आहे. केवळ एका गाण्यामुळे देखील चित्रपट सुपरहिट होतो. असे बरेच चित्रपट आहेत, जे चाहते आपल्या गाण्यांमुळे नेहमीच ओळखले जातात. चित्रपटांमध्ये गाण्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. परंतु प्रत्येक गाण्यामागे एक कथा आहे, ज्याबद्दल चाहते नेहमी अनभिज्ञ असतात (Mr India film Hawa Hawai song behind story kavita Krishnamurthy made an mistake).

1987मध्ये अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor), अमरीश पुरी (Amrish Puri) आणि श्रीदेवी (Sridevi) यांचा ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. चाहत्यांना या चित्रपटाची कथा जितकी आवडली, तितकीच या चित्रपटाची गाणी देखील आवडली. या चित्रपटाचे ‘हवा हवाइ’ हे गाणे इतके लोकप्रिय झाले की, आजही चाहत्यांना ते आवडते. या गाण्यामुळेच अभिनेत्री श्रीदेवीला ‘मिस हवा हवाई’ म्हणून ओळखले गेले. पण तुम्हाला या गाण्यामागची कहाणी माहित आहे का? चला जाणून घेऊया मनोरंजक कहाणी…

गाण्यासाठी ‘कविता’ ही पहिली पसंती नव्हती!

‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीत जोडीने दिले होते. ‘हवा हवाई’ या गाण्याला कविता कृष्णमूर्तींनी आवाज दिला होता. हे गाणे त्यावेळी खूपच गाजले. या गाण्यासाठी कविताचे कायम कौतुक केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, कविता या गाण्यासाठी कधीच पहिली पसंती नव्हती. स्वत: गायिकेने अनेक वेळा याबद्दल खुलासा केला आहे.

वास्तविक, या चित्रपटाच्या संगीतकाराने कविताकडून हे गाणे केवळ प्रात्यक्षिक म्हणून गाऊन घेतले होते, पण कविताने कठोर परिश्रम करून हे गाणे गायले. याचा परिणाम असा झाला की, जेव्हा प्यारेलाल यांनी कविताच्या आवाजात हे गाणे ऐकले, तेव्हा त्यांना ते फारच आवडले आणि त्यांनी तेच गाणे चित्रपटात ठेवले. एकदा कविता म्हणाली होती की, ती नसती तर कदाचित हे गाणे आशाजींनी गायले असते (Mr India film Hawa Hawai song behind story kavita Krishnamurthy made an mistake).

कविता गाणं गाताना चुकली!

खरं तर, कविताने या गाण्यातील एका ठिकाणी जानू ऐवजी जीनू म्हटले होते, पण हे गाणे ऐकल्यानंतर एकदा लक्ष्मीकांत यांनीच कविताला ही आनंदाची बातमी दिली की, हे गाणे तिच्याच आवाजात चित्रपटात राहील. यासह कविताला सांगण्यात आले की, ती पुन्हा हे गाणे गाणार आहे कारण गाणे गाताना तिने चूक केली आहे. होय, गाणे गाताना कविता सतत एक शब्द चुकीचा बोलत होती, त्याबद्दल तिला सांगितले गेले होते.

ऐका कविता काय म्हणते…

वास्तविक कविता जानूऐवजी जीनू म्हणून बोलत होती. चुकीचे बोलल्यानंतर पुढच्या क्षणी ती चूक तिने सुधारली आणि जानू म्हणाली, पण ही चूक अजूनही तिच्या या गाण्यांमध्ये ऐकला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले होते. या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले असून संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले होते.

(Mr India film Hawa Hawai song behind story kavita Krishnamurthy made an mistake)

हेही वाचा :

Devmanus | ‘देवमाणसा’च्या पापाचा घडा भरला, देवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती!

अवघ्या 50 रुपयांत विकत होता सलमानचा ‘राधे’, लक्षात येताच दाखल झाला FIR