#AtharvaTheOrigin : धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

धोनी आता एका ग्राफिक कादंबरीवर आधारित वेब सीरिज(Web Series)मध्ये राक्षसांना धूळ चारताना दिसणार आहे. नवीन वेब सिरीज 'अथर्व: द ओरिजिन'(Atharva-The Origin)चा फर्स्ट लूक जारी करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. टीझर(Teaser)मधल्या धोनीच्या लूकनं चाहते उत्साहित आहेत.

#AtharvaTheOrigin : धोनीच्या 'सुपरहिरो' अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!
वेब सिरीज 'अथर्व: द ओरिजिन'(Atharva-The Origin)चा फर्स्ट लूक
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 3:29 PM

Atharva First look : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मैदानावर एक नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच त्याच्या चाहत्यांमध्ये एका नव्या अवतारात दिसणार आहे. धोनी आता एका ग्राफिक कादंबरीवर आधारित वेब सीरिज(Web Series)मध्ये राक्षसांना धूळ चारताना दिसणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर धोनी आक्रमक खेळाडू म्हणूनच ओळखला जात होता. आता डिजीटलच्या मैदानात धोनीनं एन्ट्री केलीय. तिथंही तो धमाकेदार खेळ करणार, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. धोनीनं त्याच्या नवीन वेब सिरीज ‘अथर्व: द ओरिजिन'(Atharva-The Origin)चा फर्स्ट लूक जारी करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. टीझर(Teaser)मध्ये धोनीचा सुपरहिरो अवतार पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. याचे लेखन थमिलमणी यांनी केलं आहे, तर आदिकलराज आणि अशोक मनोज यांनी निर्मिती केली आहे.

नव्या अवतारात धोनी!

या ग्राफिक नॉव्हेलची घोषणा 2020मध्ये झाली होती. याची घोषणा खुद्द धोनीची पत्नी साक्षीनं केली होती. फर्स्ट लूकमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. यामध्ये तो राक्षसांचा वध करताना दिसत आहे. त्याचा टीझर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. लोकांना धोनीचा लूक प्रचंड आवडलाय. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर #AtharvaTheOrigin या हॅशटॅगलाही चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. त्याआधी अथर्वचा टीझर पाहू या.

यूझर्सकडून लाइक

यूझर्स ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरनं म्हटलंय, की हे सर्व पाहणं रोमांचक आहे. यातले ग्राफिक्सही लेटेस्ट आहेत. नवीन युगातली ग्राफिक कादंबरी आहे. या टीमला त्यांच्या अप्रतिम प्रयत्नासाठी मनःपूर्वक शुभेच्छा… यासह अनेकांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

…आणि पेट्रोलपंपावर ग्राहकाला ‘असा’ लावला चुना, तुमच्यासोबत तर असं घडत नाही ना? Funny Video Viral

Viral Video : या चिमुकलीचं Basketball कौशल्य पाहा; मग म्हणाल, उंचीनं नाही आत्मविश्वासानं जिंकता येतं मैदान

आई आणि मुलीच्या रंगलेल्या स्पर्धेत चिमुकलीला काय मिळतं गिफ्ट? धमाल उडवणारा Video Viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.