मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांचं कुटुंब देखील त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतं. मुकेश अंबानी यांचे उद्योग जगभरात पसरले आहेत. मुकेश अंबानी याची दोन मुलं आणि एक मुलगी देखील व्यवसाय सांभाळतात. मुकेश अंबानी यांना व्यवसायात मदत करण्यासाठी फक्त मुलं नाही तर एक आणखी व्यक्ती आहेत, ज्यांचा रिलायन्सच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. एवढंच नाहीतर मुकेश अंबानी यांचा ‘राईट हँट’ म्हणून देखील त्यांची ओळख आहे. शिवाय रिलायन्सचे सर्वात श्रीमंत कर्मचाऱ्यांपैकी एक ते आहेत…
रिलायन्स इंडस्ट्रीमधील ज्या व्यक्तीची सध्या चर्चा रंगत आहेत, ते दुसरे तिसरे कोणी नसून कंपनीचे संचालक पीएमएस प्रसाद आहेत. पीएमएस प्रसाद गेल्या ४२ वर्षांपासून मुकेश अंबानी यांच्यासोबत काम करत आहेत. पीएमएस प्रसाद यांनी फायबर, पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग – मार्केटिंग आणि एक्सप्लोरेशन – उत्पादन यासारख्या विभागांमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते सध्या E&P आणि R&M व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत.
पीएमएस प्रसाद यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि अण्णा विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली आहे. डेहराडून येथील विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टरेट पदवीही मिळाली आहे. मुकेश अंबानी यांच्या उद्योगात प्रसाद यांचा मोलाचा वाटा आहे.
पीएमएस प्रसाद यांच्याबद्दल अधिक सांगायचं झालं तर, त्यांनी मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्यासाठी देखील काम केलं आहे. RIL च्या हजिरा पेट्रोकेमिकल्स आणि कृष्णा गोदावरी बेसिन लाँच करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आता पीएमएस प्रसाद हे मुकेश अंबानी यांचे ‘राईट हँड’ आहेत.
पीएमएस प्रसाद रिलायन्सचे सर्वात श्रीमंत कर्मचारी आहेत. पीएमएस प्रसाद यांनी रिलायन्सची जामनगर रिफायनरी सुरू करण्यास मदत केली. प्रसाद यांचं काम पाहून मुकेश अंबानी यांनी सीईओ म्हणून प्रसाद यांना पद दिलं. २०२१ – २०२२ मध्ये कंपनीमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारे घेणारे कार्यकारी संचालक ठरले. पीएमएस प्रसाद यांचं एकून मानधन ११.८९ कोटी रुपये होतं.