सतीश कौशिक यांच्या हत्येचा दावा करणाऱ्या महिलेला कोर्टाने बजावले समन्स, पत्नीने केली होती तक्रार
दिवंगत बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील एका महिलेने त्यांची हत्या झाल्याचा दावा केला होता.
Satish Kaushik : दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाला (Satish Kaushik death) दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील एका महिलेने मीडियाशी बोलताना सतीश कौशिक यांची हत्या झाल्याचा (claimed murder) दावा केला होता. त्यानंतर सतीश यांच्या पत्नीने त्या महिलेविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने त्या महिलेला समन्स जारी केला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे. न्यायालयाने दिल्लीतील सान्वी मालू या महिलेसोबत राजेंद्र छाबरा नावाच्या व्यक्तीलाही समन्स बजावले आहे. सतीश कौशिक यांची पत्नी शशीने गेल्या महिन्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता आणि त्यात मृत्यूसाठी कोणताही कट रचलेला नव्हता, असे नमूद करण्यात आले होते.
सतीश कौशिक यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, त्या महिलेने केलेले विधान बदनामीकारक होते. आणि त्यामुळे यशस्वी चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेता असलेल्या कौशिक यांच्या प्रतिष्ठेला कधीही भरून न येणारी हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने ते विधान करण्यात आले होते. मात्र, महिलेने लावलेल्या आरोपांमध्ये कोणालाच तथ्य दिसत नाही. मात्र आता याप्रकरणी न्यायालय काय निर्णय घेते, याचे उत्तर 15 जूनलाच मिळणार आहे.
सतीश यांचं निधन नव्हे तर हत्या झाल्याचा दावा सन्वी मालू यांनी केला होता. सान्वी मालू अभिनेते सतीश कौशिक यांचे मित्र विकास मालू यांच्या पत्नी आहेत. विकास यांनी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतल्याचा दावा सान्वी मालू यांनी केला. एवढंच नाही तर, सतीश सतत पैसे मागत असल्यामुळे विकास यांनी सतीश यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप सान्वी यांनी पतीवर केला