Pradeep Patwardhan : अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन, वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
मुंबई : सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यांच्या मृत्यू मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan Passed Away) यांनी आपल्या अभिनयानं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी सिनेसृष्टीत मानानं आणि अभिमानानं मिरवावं असं व्यक्तीमत्व. त्याचं नाव सिनेसृष्टीत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
खळखळू हसणारा अवलिया
प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनासह पुरस्कार जिंकले. त्यांचा अभिनय म्हणजे मनोरंजनाचा परिपूर्ण अविष्कार होता. त्यांचा अभिनय पाहणं, ही एक पर्वणी होती. त्यांचं जाणं म्हणजे रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या. प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण अश्या या खळखळू हसवणाऱ्या या अवलियाच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत.
प्रदीप पटवर्धन यांचे अनेक सिनेमे गाजले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा या सिनेमांनी तर लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मोरूची मावशी नाटक नाट्यरसिकांना खेचून तिकीटबारीवर खेचून आणलं. तर हास्य जत्रेतून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. अश्या अवलियाचं अकाली जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे.
प्रदीप पवर्धन यांचे गाजलेले सिनेमे
एक फुल चार हाफ
डान्सपार्टी
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
गोळा बेरीज
बॉम्बे वेल्वेट
पोलीस लाईन
1234
एक शोध
थॅक्यू विठ्ठला
चिरनेर