Sushant Singh Rajput | सुशांतच्या बहिणींच्या अर्जावर सुनावणी, वाचा न्यायालयाचा निर्णय
गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी प्रियांका आणि मीतू यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल करुन गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली होती
मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बहिणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग (Mitu And Priyanka Singh Rajput) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. डॉक्टरांची औषधांची चिट्ठी नसताना औषध देणं याबाबत हा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी प्रियांका आणि मीतू यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल करुन गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली होती (Mitu And Priyanka Singh Rajput).
याबाबत आज कोर्टाने निकाल दिला आहे. सुशांत सिंग राजपूतची बहीण मीतू सिंगविरोधातील गुन्हा फेटाळला आहे. तर, दुसरी बहीण प्रियांका सिंगविरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता मीतूला जरी न्यायालयाचा दिलासा मिळाला असेल, तरी प्रियांकाविरोधात खटला सुरु राहणार आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे नाव समोर आल्यानंतर रियावर टीकेची झोड उडाली होती. यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनेत्रत्री रियानेसुद्धा वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये तिने सुशांतची बहीण प्रियांकासिंहवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हा गुन्हा रुद्द करण्यासाठी प्रियांकासिंह, मितूसिहं आणि डॉ. तरुण कुमार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींच्या याच मागणीवर कोर्टात आज सुनावणी झाली.
रिया चक्रवर्तीचे आरोप काय ?
सुशांतसिंहने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. समाजमध्यमं आणि सुशांतच्या चाहत्यांकडून रियावर टीका केली जात होती. यावेळी सुशांतची बहीण प्रियांकाने रियावर अनेक आरोप केले होते. रियाने सुशांतवर उपचार करण्यासाठी बोगस मेडिकल प्रिस्क्रिप्शनची मदत घेतली, असा दावा प्रियांकासिंह यांनी केला होता. प्रियांका यांच्या याच दाव्याविरोधात रियाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रियाने आपल्या तक्रारीत प्रियांकाने तिला 2019 मध्ये लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. तसेच माझा विनयभंग करण्याचाही प्रयत्ने केला होता, असे म्हटले होते (Mitu And Priyanka Singh Rajput).
दरम्यान, या प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Sushant Singh Rajput suicide case | रिया चक्रवर्तीची प्रियांकासिंह विरोधात तक्रार, न्यायायलयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्षhttps://t.co/buQ4ycF5bW#SushantSinghRajput
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
Mitu And Priyanka Singh Rajput
संबंधित बातम्या :
Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!
सिद्धार्थ पिठानीसोबत बहिणीच्या वर्तनावर सुशांत नाखुश, रिया चक्रवर्तीकडून व्हाॅट्सअॅप चॅटचा दाखला