डिस्को, क्लबमध्ये उमेश कुमावत यांचं ‘थक गया मै साला’ हेच गाणं चालणार; बरूण दास यांच्याकडून शुभेच्छा!
MD of TV9 Network Barun Das on New Age Rap Song Thak Gaya Main Saala by Umesh Kumawat : टीव्ही 9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांचं नवं गाणं आज लाँच झालं. या कार्यक्रमात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी बरूण दास यांनी उपस्थित राहात शुभेच्छा दिल्या. ते काय म्हणाले? वाचा...
मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले, टीव्ही 9 मराठी चॅनेलला टीआरपीच्या स्पर्धेतत अव्वलस्थानी नेणारे उमेश कुमावत यांनी नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उमेश कुमावत यांचं नवं रॅप साँग तरूणाईच्या भेटीला आलं आहे. ‘थक गया मै साला’ नव रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवं गाणं टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी बरूण दास रॅप साँगचं अनावरण झालं. टीव्ही 9 मराठीच्या ऑफिसमध्ये आज रिलीज झालं. या कार्यक्रमात बोलताना बरूण दास यांनी उमेश कुमावत यांना शुभेच्छा दिल्या.
बरूण दास यांच्याकडून शुभेच्छा!
बरूण दास यांनी या कार्यक्रमाला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. गाणं रिलीज झाल्यानंतर बरूण दास यांनी उमेश कुमावत यांना शुभेच्छा दिल्या. आता इथून पुढे सगळ्या डिस्कोमध्ये, सगळ्या क्लबमध्ये फक्त ‘थक गया मै साला’ हेच गाणं वाजणार आहे. तरूणाईला भुरळ पाडणारं, नव्या पिढीचं हे गाणं आहे. गाणं खूप छान झालंय. खूप साऱ्या शुभेच्छा, असं बरूण दास म्हणाले.
उमेश कुमावत यांच्या गाणं छान झालं आहे. हे ब्रेकएप साँग नसून ॲटिट्यूड साँग आहे. गाण्याचा व्हीडिओ खूपच क्लासी झाला आहे. हे टेकऑफ साँग आहे. उमेश यांच्यासाठी हे टेकऑफ साँग आहे. त्यांचा नवा प्रवास सुरु होत आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, असं बरूण दास म्हणाले.
‘थक गया मै साला’ रॅप साँग रिलीज
उमेश कुमावत यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे नवं रॅप साँग आहे. थक गया मै साला हे गाणं रिलीज झालं आहे. यूट्यूबवर तुम्हाला हे पाहायला मिळेल. शिवाय 150 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे गाणं पहायला मिळेल. या गाण्याचे गीतकार हे उमेश कुमावत आहेत. उमेश कुमावत यांनीच हे गाणं गायलं देखील आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन तासात या गाण्याने तीन हजार व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. उमेश कुमावत या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं तुम्हाला ऐकयला मिळेल.