सुशांतच्या घरी विशेष गॉगल होता, प्रोफाईल मॅनेजरची माहिती, श्रुती मोदीचा पोलिसांत जबाब

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सुशांतची प्रोफाईल मॅनेजर श्रुती मोदी हिचा जबाब नोंदवला (Shruti Modi Statement on Sushant Singh Suicide).

सुशांतच्या घरी विशेष गॉगल होता, प्रोफाईल मॅनेजरची माहिती, श्रुती मोदीचा पोलिसांत जबाब
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 8:24 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी सुशांतची प्रोफाईल मॅनेजर श्रुती मोदी हिचाही जबाब नोंदवला आहे (Shruti Modi Statement on Sushant Singh Suicide). यावेळी तिने सुशांतच्या घरी खास प्रकारचा गॉगल असल्याची माहिती पोलिसांना दिली. सुशांतला ग्रह, तारे पाहायला आवडायचे, असंही तिने यावेळी नमूद केलं. पोलिसांनी श्रुतीच्या नोंदवलेल्या जबाबात अनेक गोष्टींची माहिती समोर आली आहे. पोलीस या माहितीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

श्रुती मोदी जुलै 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत सुशांत सोबत होती. श्रुती मोदी म्हणाली, “या काळात सुशांत बिविड रेंज रिअलिस्टीक नावाची कंपनी स्थापन करणार होता. त्याची काही स्वप्नं होती. तो दोन ते तीन विषयांवर काम करत होता. तो नवीन, वेगळं काही तरी करण्याच्या तयारीत होता. यापैकी वर्च्युअल रियालिटी, नेशन इंडिया फॉर वर्ल्ड आणि ड्रीम 150 ही त्याची मुख्य 3 महत्त्वकांक्षी स्वप्नं होती. त्याला या तीन आयडियांच्या माध्यमातून सामाजिक काम करायचं होतं. त्याला वृक्षारोपणही करायचं होतं. सुशांतला एकाचवेळी बुद्धिमान (जिनियस) आणि शिकण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या (ड्रॉप आऊट) लोकांसोबत काम करायचं होतं.”

सुशांतचं यश राज फिल्मसोबत अॅग्रीमेंट झालं होतं. मुंबई पोलिसांनी आता यशराज फिल्म्सकडे या अॅग्रीमेंटचीही प्रत मागितली आहे.

दरम्यान,  सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. वांद्रे पोलिसांनी आज सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचाही जबाब नोंदवला. रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली. (Rhea Chakraborty reaches Bandra Police station). रिया ही सुशांतची मैत्रीण आहे. सुशांत तिच्या संपर्कात होता. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलीस तिच्याकडे विचारणा करु शकतात.

पोलिसांनी जवळपास 6 तास रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवून विचारपूस केली. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास संपला. 6 तास पोलीस तिच्याकडून माहिती घेत होते. अनेक महत्त्वाच्या विषयांवर रिया हिला विचारण्यात आलं. रियाने पोलिसांना सविस्तर उत्तरं दिली. या जबाब नोंदणीनंतर आता संंबंधित विभागाचे डीसीपी हे सुद्धा  रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.

त्याआधी पोलिसांनी काल कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

Sushant Singh Rajput Suicide | सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा चार यंत्रणांकडून तपास, गूढ शोधण्याचं आव्हान 

Shruti Modi Statement on Sushant Singh Suicide

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.