अपघात बदलणार धनंजयचं आयुष्य?; ‘प्रेमास रंग यावे’, ‘सुंदरी’ मालिका नव्या वळणावर

Pramas Rang Yave And Sundari Serial New Twist : 'प्रेमास रंग यावे' आणि 'सुंदरी' या मालिका नव्या वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. या विशेष भागात धनंजयचा अपघात झाल्याचं दाखवलं गेलं आहे. हा बदलणार धनंजयचं आयुष्य? वाचा सविस्तर...

अपघात बदलणार धनंजयचं आयुष्य?; 'प्रेमास रंग यावे', 'सुंदरी' मालिका नव्या वळणावर
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 4:59 PM

‘प्रेमास रंग यावे’, ‘सुंदरी’ या दोन्ही मालिका आता नव्या वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सन मराठीवरील मालिकेच्या महासंगम विशेष भागात घडणार आहे. यात सुंदर, सुंदरी आणि धनजंयचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. या अपघातानंतर धनंजयच्या आयुष्यात काय बदल होणार? कोण जगणार अन् कोणाचा जीव जाणार हे मालिकेच्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. येत्या 27 मे रोजी रात्री 9. 30 वाजता ‘प्रेमास रंग यावे’ आणि ‘सुंदरी’ या मालिकांचा महासंगम घडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

दोन मालिकांचा महासंगम

सुंदरी मालिकेत सुंदरी आणि सुंदर अक्षराच्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून तिला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील येणा-या संकटाला आमंत्रण देत आहे याची त्याना कल्पनाच नसते. अक्षराच्या बहिणीची सुरक्षा करण्याचा निर्णय त्यांच्याच जीवावर बेतावा म्हणून अश्विन त्यांचा अपघात घडवण्याच्या तयारीत असतो आणि दुर्देवाने त्याच्या प्रयत्नाना यश येऊन सुंदरी, धनजंय आणि सुंदर यांचा अपघात होतो. या अपघातात कोण वाचणार आणि कोणाचा जीव जाणार हे महासंगम विशेष भागात पाहायला मिळेल.

मालिकेत पुढे काय घडणार?

चांगल्या कामासाठी उचललेलं पाऊल नेमकं कोणत्या वळणावर पोहचणार किंवा त्या वळणावर नेमक्या कशाप्रकारे अडचणी येणार यांचा अंदाज कोणालाच नसतो. शेवटी नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. सन मराठी वरील सुंदरी मालिका आता वेगळ्या टप्प्यावर पोहचणार आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना स्वत:शी जोडून ठेवलं. आता पुन्हा एकदा या मालिकेत अशी घटना घडणार आहे. ज्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न आपसूक प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होईल.

अपघातामुळे मालिका कोणत्या वळणावर पोहचणार? या संकटातून बाहेर निघायचा मार्ग काय असेल आणि कसा असेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला ‘प्रेमास रंग यावे’ आणि ‘सुंदरी’ मालिकेचा महासंगम पाहावा लागणार आहे. सोमवारी 27 मे ला रात्री 9. 30 वाजता तुम्हाला सन मराठीवर पाहायला मिळणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.