Munawar Faruqui | त्याच्या मुलाची, घरच्यांची, सर्वांची काळजी घेईन, फक्त… मुनव्वरवर कोण झालं फिदा ?

| Updated on: Jan 31, 2024 | 11:24 AM

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने एक नव्हे तर तब्बल दोन रिॲलिटी शो जिंकत विजेतेपदावर नाव कोरले आहे. नुकताच तो 'बिग बॉस सीझन 17'चा विजेता ठरला, तर त्या आधी त्याने कंगना रनौतने होस्ट केलेला 'लॉकअप' शो देखील जिंकला होता. त्याच्या कॉमेडीमुळे झालेल्या वादांमुळे मुनव्वर जास्त चर्चेत आला होता.

Munawar Faruqui | त्याच्या मुलाची, घरच्यांची, सर्वांची काळजी घेईन, फक्त... मुनव्वरवर कोण झालं फिदा ?
Follow us on

मुंबई | 31 जानेवारी 2024 : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने एक नव्हे तर तब्बल दोन रिॲलिटी शो जिंकत विजेतेपदावर नाव कोरले आहे. नुकताच तो ‘बिग बॉस सीझन 17’चा विजेता ठरला, तर त्या आधी त्याने कंगना रनौतने होस्ट केलेला ‘लॉकअप’ शो देखील जिंकला होता. त्याच्या कॉमेडीमुळे झालेल्या वादांमुळे मुनव्वर जास्त चर्चेत आला होता. असं असलं तरीही मुनव्वरचं फॅन फॉलोईंगदेखील तगडं आहे. त्यामध्ये महिलांची, तरूणींची संख्या नक्कीच जास्त आहे.

त्यातच आता मुनव्वरच्या अशाच एका फॅनचा व्हिडीओ समोर आला आहे, जो तूफान व्हायरल झालाय. त्या फॅनची मुनव्वरशी लग्न करण्याची इच्छा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुलीने तिचं म्हणणं मांडलं आहे. ‘ माझं फक्त मुनव्वरशी लग्न लावून द्या. तो टू-टायमिंग काय 5-टायमिंग करेल (एका वेळेस अनेक रिलेशन्स) तरी मला मान्य असेल. त्याचं मूल, त्याच्या घरचे, कुटुंबीय ,सगळं…. मी सगळ्यांची काळजी घेईन. फक्त मुनव्वर माझ्याजवळ असला पाहिजे. मला मुनव्वर (मिळवून) द्या ‘ असं तिने या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यानंतर तिने मुनव्वरच्या फोटोला किसंही केलं.

https://www.facebook.com/reel/926214838718399

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ नेमका कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण मुनव्वरची क्रेझ स्पष्ट दिसत आहे. मुनव्वरला काही पहिल्यांदाच लग्नाची ऑफर मिळालेली नाही. यापूर्वीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मुनव्वर त्याची एक्स- गर्लफ्रेंड नाझिलसोबत होता आणि त्याचा एक फन त्याला, त्याच्या बहिणींशी लग्न करण्यास सांगत होता.

बिग बॉसमध्ये झाले अनेक आरोप

मुनव्वर फारूकी आला ‘बिग बॉस 17’ मध्ये वुमनायझर हा टॅग मिळील होता. त्या स्परध्क समर्थ जुरेल यानेच त्याला हे नाव दिलं होतं. तर या शो-मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेली मुनव्वरची एक्स-गर्लफ्रेंड आयेशा खान हिने त्याच्यावर अनेक मुलींना फसवल्याचा आरोपही लावला होता. त्यामुळे घरातल्या इतर स्पर्धकांनीही त्याला जज केलं होतं.. मात्र त्यानंतर मुनव्वरने चूक मान्य करत आयेशाची माफीही मागितली .