Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन, 47 व्या वर्षी अखेरचा श्वास

देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील गाण्यांचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हार्ट अटॅकने निधन

प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन, 47 व्या वर्षी अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 8:18 AM

पुणे : भावपूर्ण गाण्यांपासून ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांना संगीताचा साज चढवणारे प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत. (Music Director Narendra Bhide passed away)

नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी (10 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास हार्ट अटॅकने निधन झाले. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 9.30 वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

भावपूर्ण संगीत देणारा अवलिया

पेईंग घोस्ट, देऊळ बंद, बायोस्कोप, रानभूल यासारख्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन नरेंद्र भिडे यांनी केले होते. चि व चि सौ का या रोमँटिक कॉमेडी पठडीतील चित्रपटात त्यांनी दिलेली सुमधुर गाणी प्रेक्षकांच्या ओठी रुजली आहेत. याशिवाय हम्पी, उबंटू, लाठे जोशी, पुष्पक विमान, 66 सदाशिव यासारख्या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले.

अभिनयातही चुणूक

लव्हबर्डस् या थ्रिलर मराठी नाटकाचे पार्श्वसंगीतही नरेंद्र भिडे यांनी दिले होते. मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. तर आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातही ते काम करत होते.

सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही नरेंद्र भिडे यांच्यातील संगीतकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत त्यांनी अनेक चित्रपट गीतांना स्वरसाज चढवला. पुण्यातील डॉन स्टुडिओचे संगीत संयोजक आणि संचालक म्हणून ते कार्यरत होते.

संबंधित बातम्या :

…आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावाची नोंद झाली!

(Music Director Narendra Bhide passed away)

कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.