Vijay Sethupathi | ‘800’तून बाहेर पडल्यानंतरही वाद सुरूच, विजय सेतूपतीच्या मुलीला बलात्काराची धमकी

विरोध होऊ लागल्याने त्याने या चित्रपटातूत काढता पाय घेतला. ट्विटरद्वारे विजयने चित्रपट सोडण्याबाबत घोषणा केली.

Vijay Sethupathi | ‘800’तून बाहेर पडल्यानंतरही वाद सुरूच, विजय सेतूपतीच्या मुलीला बलात्काराची धमकी
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 11:35 AM

मुंबई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतूपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, अनेक वादानंतर त्याने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. तरीही अद्याप हा वाद शमलेला नाही. आता या वादात विजय सेतूपतीच्या कुटुंबियांनादेखील निशाणा बनवण्यात येत आहे. सोशल मीडियावरून विजय सेतूपतीच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत. (Muttiah Muralitharan Biopic Actor Vijay Sethupathi’s daughter gets Rape Threat on Social media)

गेल्या आठवड्यात ‘800’ चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच करण्यात आले. यामध्ये हुबेहुब मुरलीधरनसारखा दिसणाऱ्या विजय सेतूपतीने सर्वांचे लक्ष वेधले होते. परंतु चित्रपटाची घोषणा झाल्यापासून विजय सेतूपतीला चाहत्यांच्या आणि तमिळ भाषिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. रितिक नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर विजय आणि त्याच्या मुलीचा फोटो शेअर करत, बलात्काराची धमकी दिली. यानंतर अनेक वापरकर्त्यांनी या कामेंटचा चांगलाच समाचार घेतला. पोलिसांना ट्विटमध्ये टॅग करत सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय सेतूपतीला विरोध होऊ लागल्याने त्याने या चित्रपटातूत काढता पाय घेतला. ट्विटरद्वारे विजयने चित्रपट सोडण्याबाबत घोषणा केली. विजय सेतूपतीने ही घोषणा करत असताना मुथय्या मुरलीधरनचे एक भावनिक पत्रदेखील शेअर केले होते. मुरलीधरने विजयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘हा चित्रपट केल्यामुळे तुझ्या करिअरचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे तू हा चित्रपट करु नये’. हे पत्र शेअर करत विजयने ट्विटमध्ये धन्यवाद आणि निरोप घेतो, असे म्हटले आहे. (Muttiah Muralitharan Biopic Actor Vijay Sethupathi’s daughter gets Rape Threat on Social media)

काय म्हणाला मुरलीधरन?

मुरलीधरनने म्हटले आहे की, “काही लोकांमध्ये गैरसमज असल्यामुळे माझा बायोपिक असलेला चित्रपट ‘800’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही लोक अभिनेता विजय सेतूपतीवर चित्रपट सोडण्यासाठी दबाव आणत आहेत. तमिळनाडूमधल्या एका उत्कृष्ट अभिनेत्याला माझ्या चित्रपटामुळे कोणताही त्रास झाला तर मला ते चालणार नाही. त्यामुळे मी विजयला विनंती करतो की, त्याने हा प्रोजेक्ट सोडून द्यावा. मला वाटते की, या चित्रपटामुळे विजयच्या करिअरमध्ये कोणताही अडथळा होऊ नये. मी कोणत्याही अडथळ्यांना घाबरत नाही. मी त्यांच्यावर नियंत्रण मिळवतो. ते करतच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे”.

मला आशा आहे की, चित्रपटाचे निर्माते या चित्रपटाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर करतील. त्यांनी मला आश्वासन दिले आहे की, ते या चित्रपटाबाबत लवकरच नवी घोषणा करतील. मी त्यांच्या निर्णयासोबत असेन. कठीण प्रसंगी माझी साथ देणाऱ्या मीडिया, राजकीय मंडळी, विजय सेतूपतीचे चाहते आणि महत्त्वाचे म्हणजे तमिळनाडूमधील जनतेचा मी मनापासून आभारी आहे.

(Muttiah Muralitharan Biopic Actor Vijay Sethupathi’s daughter gets Rape Threat on Social media)

संबंधित बातम्या : 

मुरलीधरनचा बायोपिक ‘800’ मधून विजय सेतूपतीची माघार

Muralitharan Biopic : तमिळ भाषिकांचा नरसंहार आठव; मुरलीधरन बनलेल्या विजय सेतूपतीवर नेटिझन्स भडकले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.